Raj Thackeray : मनसेला जे 19 वर्षात जमलं नाही; ते सत्तेच गणित राज ठाकरे छोट्या पक्षांना सोबत जुळवून आणणार?

Raj Thackeray political strategy News : हिंदी सक्तीच्या विरोधात ठाकरे बंधू एकत्रित आले असल्याने येत्या काळात उद्धव ठाकरेंची शिवसेना व मनसेची मुंबई महापलिका निवडणुकीसाठी युती होण्याची शक्यता आहे.
Raj Thackeray
Raj ThackeraySarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीची घोषणा येत्या काळात होणार आहे. या निवडणुकीची तयारी राज्यातील सर्वच प्रमुख पक्ष करीत आहेत. या निवडणुका दिवाळीनंतर होणार असल्याने तयारी वेगाने सुरु आहे. या निवडणुकीसाठी महाविकास आघाडी व महायुती एकत्रित निवडणूक लढणार का स्वबळावर निवडणूक लढणार यावर बरेच काही अवलंबून आहे.

त्यातच गेल्या काही दिवसापासून हिंदी सक्तीच्या विरोधात ठाकरे बंधू एकत्रित आले असल्याने येत्या काळात उद्धव ठाकरेंची शिवसेना व मनसेची मुंबई महापलिका निवडणुकीसाठी युती होण्याची शक्यता आहे. त्यातच गेल्या आठ दिवसापासून पडद्यामागे मोठ्या राजकीय घडामोडी घडताना दिसत आहेत. त्यातच मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी शेतकरी कामगार पक्ष, बच्चू कडू यांचा प्रहार पक्षासोबतची जवळीक वाढताना दिसत आहे. त्यामुळे या एकत्र येण्यामागचे प्लॅनिंग काय असणार याबाबत विविध तर्कवितर्क लढवले जात आहेत.

आगामी काळात होत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी राज्यातील काही छोटे पक्ष राज ठाकरेंसोबत जाण्याची शक्यता आहे. त्या मुळेच मनसेचे नेते राज ठाकरे (Raj thackeray) यांनी शेकापच्या व्यासपीठावर जाऊन भाषण केले. आता प्रहारचे बच्चू कडू राज ठाकरेंची भेट घेणार आहेत. त्यामुळे राज्यातील छोटे पक्ष मनसेसोबत जाणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे. राज ठाकरे सामान्य मराठी माणसात जेवढे लोकप्रिय आहेत. तेवढेच ते राजकीय वर्तुळातही लोकप्रिय आहेत.

Raj Thackeray
BJP And Shiv Sena Alliance Trouble : उद्धव-राज युती; भाजपचं गणित फिस्कटतंय, तर शिंदे शिवसेनेसाठी धोका!

चार दिवसापूर्वीच शेकापच्या व्यासपीठावर एका कार्यक्रमाच्या निमित्ताने राज ठाकरे गेले होते. शेकापच्या (SKP) व्यासपीठावरून त्यांनी मार्गदर्शन करीत असताना विविध मुद्द्यांना हात घातला. त्यामुळे येत्या काळात राज ठाकरे शेकापसोबत युती करण्याबाबत सकारात्मक भूमिका घेऊ शकतात, अशी चर्चा रायगड परिसरात रंगली आहे.

Raj Thackeray
NCP SP News : "गद्दारी केलेल्या एक एकाला घरी पाठवणार"; अ‍ॅक्टिव्ह होताच शरद पवारांची वाघिण कडाडली!

त्यानंतर विदर्भातील आक्रमक नेते बच्चू कडूही राज ठाकरेंना भेटण्यासाठी उत्सुक आहेत. बच्चू कडू संभाव्य़ युतीबाबत काहीही बोलले नसले तरीही मनसेने प्रहारच्या आंदोलनाला पाठिंबा दिला होता. त्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंना भेटणार असल्याचं बच्चू कडू यांनी सांगितले आहे. त्यामुळे राज ठाकरे लहान पक्षासोबत जुळवून घेण्याचे धोरण स्वीकारले आहे का ? याची चर्चा रंगली आहे.

Raj Thackeray
Shivsena UBT : ठाकरेंच्या नेत्यानं उचललं टोकाचं पाऊल, 10 दिवसांपूर्वी वाढदिवस साजरा केला अन् आता आयुष्य संपवलं

तसे पहिले तर राजकारणात राज ठाकरे यांच्याकडे कोणतेच महत्त्वाचे पद नाही. त्याशिवाय त्यांच्याकडे कोणतीही सत्ता नाही, पद नाही.. तरीही सत्ताधारी असो की विरोधक प्रत्येकाला राज ठाकरे आपल्यासोबत असावेत असे वाटू लागले आहेत.

Raj Thackeray
Mahayuti Politics : कोकाटेंना दणका बसताच शिंदेंचा मंत्री अलर्ट; योगेश कदमांकडून 'सावली बार'बाबत मोठा निर्णय!

गेल्यावर्षी लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे यांनी महायुतीला बिनशर्थ पाठिंबा दिला होता. तर विधानसभा निवडणूक भाजपविरोधात लढवली होती. मात्र, आगामी काळात होत असलेलया स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका कशा लढणार याबाबत निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे महापालिका निवडणुकीसाठी त्यांनी अजून पत्ते ओपन केले नाहीत. त्यामुळे सत्ताधारी व विरोधी पक्षातील नेत्यांना राज ठाकरे आपलयाकडे येथील असे वाटत आहे.

Raj Thackeray
Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी शिवसैनिकासोबतच्या बैठकीत केला पत्ता ओपन; म्हणाले, 'मनसेसोबतच्या युतीचा निर्णय...'

हिंदी सक्तीच्या विरोधात राज व उद्धव ठाकरे बंधू एकत्रित आले असल्याने येत्या काळात उद्धव ठाकरेंची शिवसेना व मनसेची मुंबई महापलिका निवडणुकीसाठी युती होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नक्कीच चित्र बदलणार असल्याची चर्चा रंगली आहे. भविष्य काळात मनसे जर काँग्रेस आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेससोबत गेले नाहीतर शेकाप, प्रहारसारख्या छोट्या पक्षांशी त्या-त्या जिल्ह्यात राज ठाकरे युती करतील का? याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.

Raj Thackeray
BJP vs Prahar : 'नौटंकी' कोण करीत आहे? बावनकुळे-बच्चू कडू यांच्यात जुंपली

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com