Loksabha Election 2024 : मॉर्निंग वॉकला येणाऱ्यांसमवेत नरेश म्हस्के यांची 'चाय पे चर्चा'

Naresh Mhaske मॉर्निंग वॉकला येणाऱ्या प्रत्येकाशी हस्तांदोलन करुन देशाच्या विकासासाठी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी मत देण्याचे आवाहन नरेश म्हस्के यांनी केले.
Naresh Mhaske Tea Party
Naresh Mhaske Tea Partysarkarnama

Thane News : शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे, रिपाइं व मित्र पक्षांच्या महायुतीचे ठाणे लोकसभेचे शिवसेनेचे उमेदवार नरेश म्हस्के यांच्या निवडणूक प्रचारार्थ आज कोपरी आणि घंटाळी परिसरात प्रभात फेरी काढली. यावेळी घंटाळी येथील प्रभात फेरीत नरेश म्हस्के यांनी ज्येष्ठ नागरिकांसमवेत चहा पित ठाणे शहराच्या आजवर झालेला विकास आणि भविष्यातील ठाणे याविषयी चर्चा केली.

शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे, रिपाइं व मित्र पक्षांच्या महायुतीचे ठाणे लोकसभेचे शिवसेनेचे उमेदवार नरेश म्हस्के यांच्या निवडणूक प्रचारार्थ आज कोपरी आणि घंटाळी परिसरात प्रभात फेरी काढण्यात आली. महायुतीचे कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्याने उपस्थित होते.

छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन करुन सकाळी ६ वाजता बारा बंगला येथून नरेश म्हस्के यांनी प्रचाराला प्रारंभ केला. मॉर्निंग वॉकला येणाऱ्या प्रत्येकाशी हस्तांदोलन करुन देशाच्या विकासासाठी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी मत देण्याचे आवाहन नरेश म्हस्के यांनी केले.

Naresh Mhaske Tea Party
Thane Lok Sabha Election: ठाण्यात 13 महिला खासदारकीच्या शर्यतीत; एकच नाव असलेल्या दोन जोड्या

महिला वर्ग प्रभात फेरी वेळी मोठ्या संख्येने उपस्थित होता. त्यांच्याशी नरेश म्हस्के यांनी संवाद साधला. झुंबा ग्रुपच्या महिला भगिनींनी केलेल्या विनंतीला मान देऊन नरेश म्हस्के यांनी गाण्यांच्या तालावर ठेका धरला.

बारा बंगला येथील संगीत कट्ट्यावरील ज्येष्ठ नागरिकांशी विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. घंटाळी येथील प्रभात फेरीत नरेश म्हस्के यांनी ज्येष्ठ नागरिकांसमवेत चहा पित ठाणे शहराच्या आजवर झालेला विकास आणि भविष्यातील ठाणे याविषयी चर्चा केली.

Edited By : Umesh Bambare

Naresh Mhaske Tea Party
Thane Lok Sabha Election : ठाण्यात शिवसेनेचे दोन्ही गट अस्तित्वासाठी भिडणार; बाण चालणार की मशाल पेटणार?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com