Parbhani News : आर्थिक कोंडीत सापडलेल्या परभणी महापालिकेला दिलासा; जीएसटी परताव्याचे पावणे आठ कोटी मिळणार!

Political News : महापालिकेची आर्थिक परिस्थिती खालावलेली असताना जीएसटीच्या परतव्या पोटी शासनाकडे थकलेली रक्कम लवकरच मिळणार आहे. आमदार राहुल पाटील यांनी या संदर्भात विधिमंडळात प्रश्न उपस्थित केला होता.
Rahul Patil
Rahul Patil Sarkarnama
Published on
Updated on

गणेश पांडे

Marathwada Politics News : परभणी महापालिकेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा मुस्लिम महापौर विराजमान झाल्यानंतर एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. महापालिकेची आर्थिक परिस्थिती खालावलेली असताना जीएसटीच्या परतव्या पोटी शासनाकडे थकलेली रक्कम लवकरच मिळणार आहे. आमदार राहुल पाटील यांनी या संदर्भात विधिमंडळात प्रश्न उपस्थित केला होता.

या प्रश्नाला उत्तर देतांना संबंधित खात्याच्या मंत्र्यांनी परभणी महापालिकेचे शासनाकडे थकीत जीएसटीचे 73 कोटी 71 लाख रुपयांच्या अनुदानाचा प्रस्ताव दोन दिवसात मंत्रिमंडळ बैठकीत ठेवून त्याला मंजुरी देणार असल्याचे सांगीतले. नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी या संदर्भात लेखी उत्तर दिले आहे. आमदार डॉ. राहुल पाटील यांनी विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात गुरुवारी लक्षवेधी उपस्थित करत जीएसटीचे थकीत अनुदान देण्याची मागणी केली होती.

Rahul Patil
BJP Deputy Sabhapati : उपसभापतिपदी निवड होताच भाजप नेत्याची जातीच्या दाखल्याची सुनावणी ठरली; सोलापूर, उमारग्यात तक्रार

परभणी महापालिकेच्या जीएसटी अनुदानाचा मुद्दा आमदार डॉ. राहुल पाटील (Rahul Patil) यांनी सभागृहात आक्रमकपणे लावून धरला. मनपाची स्थिती अत्यंत बिकट झालेली आहे. येथील आयुक्तांसह सर्व कर्मचाऱ्यांचे गेल्या पाच ते सहा महिन्यांचे वेतन थकीत आहे. कोणत्याही प्रकारचे उत्पन्नाचे साधन नाही, त्यामुळे परभणी मनपाला आर्थिक संकटातून जावे लागत आहे. महानगरपालिकेची स्थापना झाली तेव्हा एलबीटी ही कर प्रणाली होती. त्यानंतर 2016 मध्ये जीएसटी लागू झाली.

Rahul Patil
Shivsena Case: "पुन्हा आशा पल्लवित झाल्या"; शिवसेनेच्या आजच्या सुनावणीबाबत असीम सरोदेंनी दिली अत्यंत महत्वाची माहिती

परंतु शासनाने काही कारणास्तव कर वसुलीला स्थगिती दिली, त्यामुळे महापालिकेला शासनाकडून कमी परतावा मिळू लागला. तेव्हापासूनची महापालिकेची जीएसटीची थकीत परतावा रक्कम शासनाकडे प्रलंबित आहे. 73 कोटी 71 लाख रुपयांची ही रक्कम असून ही रक्कम तातडीने मंजूर करावी, जेणेकरून वेतनासह अन्य प्रश्न सुटतील, असे आमदार पाटील यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले.

Rahul Patil
Pune Congress : पुणे काँग्रेसमध्ये मोठा भूकंप : बड्या नेत्यावर तिकीट विक्री अन् जमीन हडपल्याचा आरोप: थेट राहुल गांधींना लिहिलं पत्र

त्यावर नगर विकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ (Madhuri Misal) यांनी उत्तर दिले त्या म्हणाल्या, परभणी मनपाची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट आहे हे मान्य आहे. परभणी महानगरपालिकेचे जीएसटी अनुदान देखील थकीत आहे. आमदार डॉ. राहुल पाटील यांनी जो मुद्दा उपस्थित केला तो योग्य आहे, तातडीने येत्या दोन दिवसात सकारात्मक प्रस्ताव कॅबिनेट बैठकीत मांडला जाईल आणि तो मंजूर करू.

Rahul Patil
NCP News: राष्ट्रवादीनं 'हवेली' ताब्यात घेतली!अपक्षाच्या पाठिंब्यानं सत्तेची गणिते जुळली!

यामुळे परभणी महानगरपालिकेला लवकरच जीएसटीचे अनुदान मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. आमदार डॉ. राहुल पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे महानगरपालिकेची शासनाकडे असलेली थकीत रक्कम मिळणार असून त्यामुळे मनपातील कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा प्रश्न सुटणार आहे.

Rahul Patil
BJP Politics : जयंत पाटलांना मोठा धक्का, भाजपकडून घरातील माणूस फोडण्याची तयारी, 'भाचेबुवा' हाती घेणार कमळ?

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com