BJP Victory : मोहिते पाटलांच्या बालेकिल्ल्यात भाजपच्या विजयाचे सेलिब्रेशन...

Assembly Election result 2026 : पश्चिम बंगाल, आसाम आणि पाँडेचरीमध्ये भाजपने मोठा विजय मिळवला. बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांची सत्ता उलथवून दोनशेपेक्षा अधिक जागांसह ऐतिहासिक यश मिळवले.
BJP Victory
BJP VictorySarkarnama
Published on
Updated on

Solapur, 04 May : पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने पश्चिम बंगाल, आसाम आणि पाँडेचरीमध्ये दणदणीत विजय मिळविला आहे. पश्चिम बंगालमधील विजयाचे मोल अधिक आहे, कारण तुल्यबळ प्रतिस्पर्धी ममता बॅनर्जी यांची दहा वर्षांची सत्ता उलथवून टाकत भाजपने या ठिकाणी दोनशेपेक्षा जास्त जागा मिळविल्या आहेत.

दरम्यान, तीन राज्यांत मिळविलेल्या विजयाचे भारतीय जनता पक्षाचे माजी आमदार राम सातपुते यांनी मोहिते पाटील (Mohite Patil) यांचा बालेकिल्ला असलेल्या अकलूजमध्ये कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये जोरदार सेलिब्रेशन करण्यात आले.

आसाममध्ये भारतीय जनता पक्षाने (BJP) सलग तिसऱ्यांदा विजय मिळविला आहे. हेमंत बिस्वा सरमा यांच्या नेतृत्वाखाली भाजपने शंभरपेक्षा जास्त जागा जिंकून आसाम पुन्हा जिंकले आहे. आसामरोबरच भाजपने मित्रपक्षाच्या साहाय्याने पाँडेचरीमध्येही पुन्हा सत्ता मिळविली आहे.

पश्चिम बंगालमध्ये भारतीय जनता पक्षाने पहिल्यांदा सत्ता मिळविली आहे. ममता बॅनर्ती यांना शंभरच्या आतमध्ये रोखून भाजपने २०६ जागा जिंकल्या आहेत. बंगालमध्ये सत्ता मिळवून भाजपने आपल्या स्वप्नाची पूर्ती केली आहे, त्यामुळे बंगालच्या विजयाचे महत्व भाजपच्या दृष्टीने महत्व आहे.

BJP Victory
BY Election : पोटनिवडणुकीतही भाजप अन्‌ मित्रपक्षाची बाजी; काँग्रेसनेही राखला गड!

दरम्यान, भाजपच्या तीन राज्यांतील विजयाचा माळशिरस तालुक्यात जल्लोषात आनंदोत्सव साजरा करण्यात आला. माजी आमदार राम सातपुते यांच्या प्रमुख उपस्थितीत अकलूज येथील गांधी चौकात कार्यकर्त्यांनी मिठाई वाटून विजयाचा आनंद साजरा केला.

यावेळी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करीत आनंदोत्सव साजरा केला.यावेळी भारतीय जनता पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष बाजीराव काटकर, माळशिरस चे माजी नगराध्यक्ष अप्पासाहेब देशमुख, सचिन शिंदे यांच्या सह हजारो कार्यकर्ते उपस्थित होते.

BJP Victory
Devendra Fadnavis : आसाममध्ये फडणवीसांचा 100 टक्के स्ट्राईक रेट : भाजपच्या विजयी हॅट्‌ट्रीकमध्ये उचलला खारीचा वाटा

तीन राज्यांतील भाजपचा विजय जनतेच्या अपेक्षा, विकासाची दिशा आणि सक्षम नेतृत्वावरचा विश्वास दर्शवणारा आहे. भारतीय जनता पक्षाची विचारधारा ही देशप्रेमाने ओथंबून भरलेली आहे. येथे राष्ट्र प्रथम ही भावना महत्त्वाची आहे. हे यश पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांच्या नेतृत्वाचे आहे. आज श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी पाहिलेलं स्वप्न पूर्ण झालं आहे, अशी भावना राम सातपुते यांनी व्यक्त केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com