BJP Vs Shivsena: पोस्टरमुळे भाजप-शिंदे गटात पडणार वादाची ठिणगी ?

Lok Sabha Election 2024 : आगामी लोकसभा निवडणूक लढण्यासाठी इच्छुक असलेल्या नेत्यांची नावे समोर येत आहेत.
BJP VS Sjivsena
BJP VS SjivsenaSarkarnama
Published on
Updated on

Pune News : शहरभर लागलेले पोस्टर हे आपण लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहोत, हे दाखवण्याचे एक प्रकारचे माध्यमच बनले आहे. त्यामुळे पुणे शहरांमध्ये विविध कार्यक्रमाच्यानिमित्ताने सध्या पोस्टर वॉर रंगल्याचे पाहायला मिळत आहे. मात्र यातील काही पोस्टर वादाचा आणि चर्चेचा विषय बनत आहेत.

लोकसभा निवडणुका जसजशा जवळ येत आहेत, तसं भाजपबरोबरच काँग्रेस, राष्ट्रवादी आणि मनसेमधील आगामी लोकसभा निवडणूक लढण्यासाठी इच्छुक असलेल्या नेत्यांची नावे समोर येत आहेत. यातील काही इच्छुक आपण लोकसभा निवडणूक लढण्यासाठी तयार असल्याचे सांगत दंड थोपटताना दिसत आहेत, तर काही इच्छुक शहरात पोस्टरबाजी करून आपण रेसमध्ये असल्याचं दाखवून देत आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

BJP VS Sjivsena
Shirur Loksabha: अजितदादांनंतर मुख्यमंत्री शिंदेंचंही 'मिशन शिरूर' कोल्हेंविरोधात उमेदवार कुणाचा; अजितदादा की शिंदेंचा ?

यातूनच पुण्यातून इच्छुक असलेल्या भाजप उमेदवारांमध्ये सध्या पोस्टर वॉर सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे, तर दुसरीकडे काँग्रेस पक्षातील इच्छुकांकडून शहरभर पोस्टर लावत आपणदेखील मैदानात उतरण्यासाठी तयार आहोत, हे दाखवून देण्याचा प्रयत्न होत आहे. या इच्छुकांमध्ये भाजपचे माजी आमदार जगदीश मुळीक यांचेदेखील नाव अग्रभागी आहे.

मागील महिन्यात जगदीश मुळीक यांनी बागेश्वरबाबा यांना बोलावून मोठा दरबार भरवला. या दरबाराला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही उपस्थिती लावली होती. त्यानंतर 'पुणे थॉन' कार्यक्रमाचे आयोजन करून शहरभर पोस्टरबाजी करण्यात आली.

आता जगदीश मुळीक यांनी सारसबाग चौकामध्ये शिवसेना शिंदे गटाच्या ऑफिसच्यावर लावलेले बॅनर चर्चेत आले आहे. शिंदे गटाकडून तिथे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांचे फोटो असलेले पोस्टर लावण्यात आले आहे, तर त्या पोस्टरच्यावर मुळीक यांनी पोस्टर लावल्याने काही कार्यकर्त्यांकडून आक्षेप घेण्यात आला आहे. त्यामुळे पुढील काळात हा पोस्टर भाजप (BJP) आणि शिवसेना (Shivsena) शिंदे गटामध्ये वादाचे कारण बनू शकतो.

(Edited By Ganesh Thombare)

BJP VS Sjivsena
Rupali Chakankar : "अजितदादांमुळेच सुप्रिया सुळे 15 वर्षे बारामतीत निवडून आल्या, हे त्यांनी विसरू नये!"

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com