CM Kolhapur Tour : क्षीरसागरांना बाजूला ठेवून मुख्यमंत्र्यांची कोल्हापूरच्या दोन्ही खासदारांसोबत चर्चा!

Loksabha Election 2024 : शिवसेनेच्या विद्यमान खासदारांबाबत असलेल्या नाराजीमुळे कोल्हापूर किंवा हातकणंगले लोकसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार देण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्याचबरोबर शिंदे गटाच्या चिन्हावर भाजपचा उमेदवार असाही प्रस्ताव ठेवल्याची माहिती आहे. या सर्व घडामोडीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर पेच निर्माण झाला आहे.
CM Eknath Shinde & Two MP
CM Eknath Shinde & Two MPSarkarnama
Published on
Updated on

Kolhapur News : कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघात महायुतीचा उमेदवार कोण असणार, याबाबत अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. या दोन्ही जागा शिवसेना शिंदे गटाकडे असणार की भाजपचे उमेदवार असणार याबाबतही अजून स्पष्टता नाही. कोल्हापूरच्या खासदारांबाबत असणारी नाराजी आणि त्यातून उमेदवारी बदलाबाबत असलेली चर्चा यामुळे संजय मंडलिक यांच्या उमेदवारीबाबत शंका उपस्थित होत आहे. हातकणंगले लोकसभा मतदारसंघाबाबत हीच परिस्थिती आहे. विद्यमान खासदारांना आपल्यालाच उमेदवारी मिळणार, असा ठाम विश्वास असला तरी रोज नव्या नावांची होणारी चर्चा यामुळे हातकणंगल्याचे खासदार धैर्यशील माने यांच्यामध्ये अस्वस्थता आहे.

शिवसेनेच्या विद्यमान खासदारांबाबत असलेल्या नाराजीमुळे कोल्हापूर (Kolhapur) किंवा हातकणंगले (Hatkanangle) लोकसभा मतदारसंघात भाजपचे (BJP) उमेदवार देण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्याचबरोबर शिंदे गटाच्या चिन्हावर भाजपचा उमेदवार असाही प्रस्ताव ठेवल्याची माहिती आहे. या सर्व घडामोडीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासमोर पेच निर्माण झाला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

CM Eknath Shinde & Two MP
BJP News : महिला आरक्षण आल्यावर उत्तम जानकर साडी घालून उमेदवारी मागतील; लक्ष्मण ढोबळेंचा टोला

शिवसेनेच्या फुटीनंतर दोन्हीही विद्यमान खासदारांवर आगामी लोकसभा निवडणुकीतील उमेदवारीचा शब्द घेऊन शिंदे गटात सोबत गेल्याची आठवण करून देण्याची वेळ आली आहे. अशा परिस्थितीत उमेदवारी बदलाच्या चर्चा होत असताना आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कोल्हापूर दौऱ्यावर आल्यानंतर दोन्हीही विद्यमान खासदारांनी मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेऊन चर्चा केली.

सध्या या भेटीचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत खासदार धैर्यशील माने, खासदार संजय मंडलिक, आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर हे चर्चा करताना दिसत आहेत. मात्र, त्याचवेळी राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांना या चर्चेपासून बाजूला ठेवण्यात आल्याचे त्या फोटोतून दिसत आहे.

CM Eknath Shinde & Two MP
Nanded BJP : अशोक चव्हाण हे चिखलीकरांचा गेम करणार...? की पाठीशी उभे राहणार...?

दरम्यान, या भेटीत काय नेमकी चर्चा झाली, हे कळू शकलेले नाही. मात्र राजकीय परिस्थितीवर या भेटीत चर्चा झाल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. कोणत्याही परिस्थितीत उमेदवारी मिळविण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे यांनी प्रयत्नशील राहावे, अशी विनंती हे दोन खासदार करत असावेत, अशी चर्चा हा फोटो पाहून होत आहे. खासदार संजय मंडलिक यांना पुन्हा उमेदवारी मिळावी, अशी आग्रही मागणी आमदार प्रकाश अबिटकर यांनी केल्याची माहिती सांगितली जात आहे.

Edited By : Vijay Dudhale

CM Eknath Shinde & Two MP
Lok Sabha Election 2024 News : कोल्हापुरातील दोन अपक्ष आमदार महायुतीवर नाराज ? मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यात व्यक्त केली खंत

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com