Sarkarnama
Tukai Irrigation Scheme : लोकार्पणाचा गाजावाजा, पण वितरण कुंड कोरडाच? राम शिंदेंच्या तुकाई योजनेवर शरद पवार राष्ट्रवादीचा हल्लाबोल!
Karjat Irrigation Project : अहिल्यानगरच्या कर्जत तालुक्यातील 21 गावांना लाभ देणाऱ्या तुकाई उपसा सिंचन योजनेच्या लोकार्पण सोहळ्यावरून राजकीय वाद निर्माण झाला आहे.
विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी राज्याचे मंत्री संजय राठोड यांच्या उपस्थितीत या योजनेचा लोकार्पण सोहळा पार पाडला. मात्र, कार्यक्रमाच्या वेळी वालवड येथील वितरण कुंडात पाणी पोहोचले नसल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे तालुकाध्यक्ष रघुआबा काळदाते यांनी केला आहे.
योजनेचे काम पूर्ण होण्यापूर्वीच लोकार्पणाची घाई का करण्यात आली? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे काळदाते यांनी उपस्थित केला. सोशल मीडियावर कार्यक्रमाचे विविध फोटो प्रसिद्ध करण्यात आले; मात्र वितरण कुंडात पाणी पोहोचल्याचा फोटो का प्रसिद्ध केला नाही, असा प्रश्नही त्यांनी विचारला. तुकाई उपसा सिंचन योजनेतून कर्जत तालुक्यातील 21 गावांना लाभ मिळणार असून, या योजनेद्वारे 27 लहान-मोठे तलाव भरले जाणार आहेत. 7 मार्च 2019 रोजी तत्कालीन सहकार मंत्री सुभाष देशमुख आणि तत्कालीन पालकमंत्री प्रा. राम शिंदे (Ram Shinde) यांच्या हस्ते या योजनेचा प्रारंभ करण्यात आला होता.
या योजनेसाठी सुरुवातीला 61 कोटी रुपयांचा निधी मंजूर होता. त्यानंतर निधी वाढवून 68 कोटी रुपये करण्यात आला. (NCPSP) आमदार रोहित पवार यांनीही योजनेचा पाठपुरावा करून आवश्यक मंजुरी मिळवली, काही गावांचा समावेश केला आणि महाविकास आघाडी सरकारच्या काळात अतिरिक्त निधी मिळवून दिला, असे काळदाते यांनी सांगितले. मात्र, योजनेचे काम अद्याप पूर्ण झाले नसून काही गावांमध्ये वितरण नलिका टाकण्याचे काम बाकी असल्याचा दावा त्यांनी केला. योजनेचे सुमारे 70 ते 75 टक्के काम पूर्ण झाले असल्याचेही त्यांनी नमूद केले.
Ahilyanagar DCC Bank : विखे-थोरात एकत्र आले, अनेकांच्या अडचणी वाढल्या! शंकरराव गडाखांनी एका वाक्यात सांगितलं राजकीय गणित
वितरण कुंडात पाणीच नाही...
सोमवारी वालवड येथे योजनेच्या वितरण कुंडाजवळ मोठा शामियाना उभारून चाचणीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मात्र, पंप हाऊसपासून जलकुंभापर्यंत पाणी पोहोचले नसल्याने कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या लाभार्थी ग्रामस्थांचा भ्रमनिरास झाल्याचा आरोप काळदाते यांनी केला. योजनेच्या वितरण व्यवस्थेची कामे पूर्ण होण्यापूर्वी आणि शासनस्तरावरील चाचण्या पार पडण्याआधीच लोकार्पण सोहळा आयोजित करण्याची घाई का करण्यात आली, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
Shivsena Santosh Pawar missing : 50 लाखांच्या नोटांचा बॉक्स, व्हिडीओ व्हायरल अन् आता शाखाप्रमुख बेपत्ता? संदीप देशपांडे म्हणाले, 'अपहरण तर झाले नाही ना?'
पालकमंत्री विखेंची कार्यक्रमाला अनुपस्थित
या कार्यक्रमाला पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील अनुपस्थित राहिल्याचा मुद्दाही काळदाते यांनी उपस्थित केला. योजनेच्या कामकाजाची पूर्ण माहिती घेतल्यानंतर विखे पाटील यांनी कार्यक्रमाला उपस्थित न राहणे उचित समजले असावे, असा दावा त्यांनी केला.
एमआयडीसीचा मुद्दा उकरून काढला
आमदार रोहित पवार यांनी पाठपुरावा करून तरुणांना रोजगार उपलब्ध करून देणारी एमआयडीसी मंजूर करून आणली; मात्र राजकीय श्रेयवादातून त्यात अडथळे आणण्यात आले, असा आरोप काळदाते यांनी केला. कर्जत आगाराचे काम पूर्ण होऊन बस उपलब्ध झाल्यानंतरही अडथळे आणण्यात आल्याचा दावा त्यांनी केला.
लोकार्पणाची घाई का?
तुकाई उपसा सिंचन योजनेचे काम अपूर्ण असताना पाणी पूजन आणि लोकार्पण करण्याची घाई करणे हे विधान परिषदेच्या सभापती पदाला न शोभणारे असल्याची टीका काळदाते यांनी केली. 'अपूर्ण कामांचे उद्घाटन आणि श्रेयवाद करण्यापेक्षा प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या शेतात पाणी पोहोचविण्यासाठी पदाला शोभेल असे काम करावे,' असे आवाहनही त्यांनी केले.
ठेकेदाराच्या संथ कामाचा मुद्दा
तुकाई उपसा सिंचन योजनेचे काम संबंधित ठेकेदाराने अत्यंत संथगतीने केल्याचा आरोप काळदाते यांनी केला. या साडेसात वर्षांच्या कालावधीत दोन विधानसभा निवडणुका पार पडल्या. दोन्ही निवडणुकांमध्ये प्रा. राम शिंदे यांना आमदार रोहित पवार यांच्यापेक्षा कमी मतदान मिळाले आणि त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले, असे त्यांनी नमूद केले. ही योजना आपणच मार्गी लावणार, असा निर्धार राम शिंदे यांनी केला असला, तरी लोकार्पण सोहळ्याच्या वेळी वितरण कुंडात पाणी आणता आले नाही, ही शोकांतिका असल्याची टीका काळदाते यांनी केली.
2029च्या निवडणुकीची चाचणी?
तुकाई उपसा सिंचन योजनेच्या चाचणीचा हा कार्यक्रम होता की 2029 च्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची चाचणी, असा उपरोधिक सवाल काळदाते यांनी उपस्थित केला. योजनेचे लोकार्पण झाल्यानंतर प्रत्यक्ष लाभार्थी गावांमध्ये पाणी पोहोचते का, याकडे आता कर्जत तालुक्यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
खासगी नोकरी असली तरीही पेन्शनची चिंता मिटणार; 'या' योजनेअंतर्गत दरमहा 5 हजार मिळणार
Atal Pension Yojana
अटल पेन्शन योजना
अटल पेन्शन योजना ही खासगी क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी निवृत्तीनंतर आर्थिक सुरक्षितता देणारी केंद्राची योजना आहे.
Atal Pension Yojana
वय
१८ ते ४० वर्षे वयोगटातील भारतीय नागरिक या योजनेत सहभागी होऊ शकतात. ३० व्या वर्षी गुंतवणूक सुरू केल्यास ६० वर्षांपर्यंत हप्ते भरावे लागतात.
Atal Pension Yojana
गुंतवणूक
योजनेत मासिक, तिमाही किंवा सहामाही पद्धतीने गुंतवणूक करता येते. हप्त्याची रक्कम निवडलेल्या पेन्शननुसार ठरते.
Atal Pension Yojana
खाते
१ ऑक्टोबर २०२२ पासून प्राप्तिकर भरणाऱ्या नागरिकांना नवीन खाते उघडता येत नाही. मात्र, त्यापूर्वी खाते उघडलेले गुंतवणूक सुरू ठेवू शकतात.
Atal Pension Yojana
नोंदणी
बँक किंवा पोस्ट ऑफिसमधील बचत खात्याद्वारे प्रत्यक्ष किंवा ऑनलाइन नावनोंदणी करता येते. हप्त्याची रक्कम खात्यातून ऑटो-डेबिट होते.
Atal Pension Yojana
पेन्शन
वयाची ६० वर्षे पूर्ण झाल्यानंतर निवडलेल्या पेन्शन स्लॅबनुसार खातेदाराला आयुष्यभर दरमहा पेन्शन मिळते.
Atal Pension Yojana
नॉमिनी
खातेदाराच्या निधनानंतर त्याच्या पती किंवा पत्नीला तीच मासिक पेन्शन मिळते. दोघांच्याही निधनानंतर नॉमिनीला निधी परत केला जातो.
Atal Pension Yojana
पर्याय
५,००० रुपये मासिक पेन्शनचा पर्याय निवडल्यास खातेदार आणि जोडीदाराच्या निधनानंतर नॉमिनीला सुमारे ८.५ लाख रुपये मिळतात.
Atal Pension Yojana
हमी
या योजनेत निश्चित पेन्शनची हमी दिली जाते. गुंतवणुकीवरील परतावा कमी पडल्यास केंद्र सरकार तूट भरून काढते.
Sharankumar Limbale
NEXT : अक्करमाशी ते शंभराव्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष : कोण आहेत शरणकुमार लिंबाळे?
Shiv Sena Case : अंतिम सुनावणीपूर्वी कायदेशीर डावपेचांना वेग; '21 जूनला मूळ पक्ष कोणाचा?' सिब्बल यांच्या युक्तिवादाने शिंदेंची धाकधूक वाढली!
New Dehli News : शिवसेना चिन्ह-पक्ष आणि आमदार अपात्रता सुनावणी आता अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. सुप्रीम कोर्टात बुधवारी सुनावणी पार पडली. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे वकील ध्रुव मेहता यांच्या युक्तिवादानंतर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे वकील कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद केला. पक्ष आणि चिन्हाच्या वादातील न्यायालयीन सुनावणीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले असतानाच  एकनाथ शिदेंच्या वकिलांचा युक्तिवाद संपल्यानंतर आता उद्धव ठाकरेंच्या वतीने ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल प्रतियुक्तिवाद करत आहेत. यावेळी सिब्बल यांनी मुद्द्यालाच हात घेतला असून 21 जून रोजी मूळ पक्ष कोणाचा होता हे ठरवणे महत्त्वाचे असल्याचे स्पष्ट केले आहे. सिब्बल यांच्या या सवालाने एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची धाकधूक वाढली आहे.
सुप्रीम कोर्टात बुधवारी शिवसेना (Shivsena) चिन्ह-पक्ष युक्तिवाद सुरु होताच कपिल सिब्बल   यांनी महत्त्वाचा मुद्दा मांडला. 21 जून रोजी मूळ पक्ष कोणाचा होता हे ठरवणे महत्त्वाचे आहे. विधानसभा अध्यक्षांनी आपल्या आदेशात शिंदे गटाच्या 26 जूनच्या ठरावाचा आधार घेतला. या ठरावाला 31 आमदारांचा पाठिंबा असल्याचे नमूद करून विधिमंडळातील बहुमताच्या आधारे शिंदे गट हाच खरा राजकीय पक्ष असल्याचा निष्कर्ष काढला.
कपिल सिब्बल (Kapil sibbal) म्हणाले, 'मूळ राजकीय पक्षाचे प्रतिनिधित्व कोणता गट करतो, याचा प्राथमिक निर्णय विधानसभा अध्यक्ष घेतात' विधानसभा अध्यक्षांसमोरील अपात्रतेची कार्यवाही आणि निवडणूक चिन्ह आदेशाच्या परिच्छेद 15 अंतर्गत होणारी कार्यवाही या दोन्ही स्वतंत्र आणि वेगळ्या आहेत. विधानसभा अध्यक्षांना हे ठरवायचे होते की, एखाद्या सदस्याने स्वतःच्या कृतीतून स्वेच्छेने पक्षाचे सदस्यत्व सोडले आहे का आणि त्यामुळे तो अपात्र ठरतो का. यासाठी संबंधित सदस्याचे वर्तन महत्त्वाचे आहे. मूळ राजकीय पक्षाचे प्रतिनिधित्व कोणता गट करतो, याचा प्राथमिक निर्णय विधानसभा अध्यक्ष घेतात.
Congress Shiv Sena News : शिवसेना आमदाराचा डाव काँग्रेस नेत्यानं उलटवला? श्रीकांत शिंदेंच्या उपस्थित झालेला पक्षप्रवेश दिशाभूल करणारा, दुर्राणींचा मोठा दावा
समजा, सरकारमधील सत्ताधारी पक्षाचे बहुमत केवळ चार-पाच आमदारांचे आहे. अशा परिस्थितीत एका पक्षाचे सहा आमदार पक्षाच्या भूमिकेशी असहमती दर्शवून दुसऱ्या बाजूला जाऊ शकतात. त्यामुळे सरकारचे बहुमत कोसळू शकते. अशा कृतीला पक्षांतर किंवा बंडखोरी म्हणायचे की स्वसंरक्षणाची कृती? अशा प्रकारच्या राजकीय खेळीचे न्यायालयाने गांभीर्याने परिणाम तपासले पाहिजेत. एखाद्या राजकीय पक्षाला सत्ता मिळवायची असेल किंवा सरकार स्थिर ठेवायचे असेल, तर बहुमताचे स्वरूप लक्षात घेऊन अशा राजकीय हालचाली केल्या जातात. सध्या जे घडत आहे, ते याचाच भाग आहे, असेही कपिल सिब्बल म्हणाले. यानंतर सिब्बल म्हणाले की, त्यांनी न्यायालयासमोर प्राथमिक भूमिका मांडली असून आता ते आपल्या लेखी युक्तिवादाकडे येऊ इच्छितात, असेही त्यांनी स्पष्ट केले.
BJP-Akali Dal Alliance: 2019 ला ठाकरेंनी केलेली चूक बादलांनी टाळली; भाजपसोबत युतीची 'डील' फायनल करण्यापूर्वीच शहांसमोर ठेवल्या दोन मोठ्या अटी...
Maharashtra Politics : कोयनेचे पाणी मुंबईला? कोकणातूनच विरोधाचा आगडोंब ! तटकरेंसह आमदार शेखर निकम पाठोपाठ ZP अध्यक्षांचा महायुतीला घरचा आहेर
Raigad News : कोयना जलविद्युत प्रकल्पातून वीजनिर्मितीनंतर समुद्राकडे वाहून जाणारे ६७ टीएमसी पाणी मुंबईकडे वळवण्याच्या प्रस्तावावर राज्य सरकार अभ्यास करत असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे. मात्र, या प्रस्तावावरून आता कोकणात राजकीय संघर्षाची ठिणगी पडली आहे. कोकणातील जनतेच्या पिण्याच्या पाण्याचा आणि स्थानिक विकासाचा प्रश्न उपस्थित करत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शेखर निकम, खासदार सुनील तटकरे आणि शिंदेंच्या शिवसेनेच्या रायगड जिल्हा परिषद अध्यक्षा अस्मिता केंद्रे यांनी या प्रस्तावाबाबत सावध भूमिका घेत विरोध दर्शवला आहे.
कोकणात मुबलक पाऊस पडत असतानाही अनेक गावांना उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्यासाठी संघर्ष करावा लागतो. शेती आणि उद्योगांसाठीही पुरेसे पाणी उपलब्ध होत नाही. अशा परिस्थितीत कोकणाच्या हक्काचे पाणी मुंबईकडे वळवण्याचा निर्णय घेतल्यास स्थानिक जनतेवर अन्याय होईल, अशी भावना या लोकप्रतिनिधींनी व्यक्त केली आहे. महायुतीतील घटक पक्षांच्या नेत्यांनीच या प्रस्तावावर आक्षेप घेतल्याने सरकारसमोरील अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
मुंबईची तहान भागवण्यासाठी कोयना धरणातील पाणी वळवण्याचा विचार सुरू असताना कोकणातील जनतेच्या पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष होता कामा नये, अशी ठाम भूमिका खासदार सुनील तटकरे यांनी मांडली आहे. मुंबईला पाणी मिळाले पाहिजे; मात्र त्यासाठी कोकणातील जनतेच्या घशाला कोरड पडता कामा नये, असे त्यांनी स्पष्ट केले. मुंबईला पाणी देण्यापूर्वी रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या तिन्ही जिल्ह्यांची पाण्याची गरज प्राधान्याने पूर्ण करावी, अशी मागणी त्यांनी केली.
Koyna Dam Water : कोयना धरणाचं 67 टीएमसी पाणी मुंबईकडे वळवणार? सातारा-सांगलीत विरोधाची ठिणगी; CM फडणवीसांना थेट इशारा
मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असली, तरी कोकणातील जनतेच्या मूलभूत गरजांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. पाणीवाटपाचा आराखडा तयार करताना कोकणातील लोकसंख्या, शेती, उद्योग आणि पिण्याच्या पाण्याची गरज यांचा एकत्रित विचार झाला पाहिजे. तसेच कोकणाच्या हक्काचे पाणी सुरक्षित ठेवले पाहिजे, असा आग्रह तटकरे यांनी धरला.
दरम्यान, आमदार शेखर निकम यांनीही या प्रस्तावावरून सरकारला स्पष्ट इशारा दिला आहे. चिपळूण-गुहागर बायपास रस्त्याच्या भूमिपूजन कार्यक्रमानंतर बोलताना त्यांनी आधी कोकणातील जनतेची तहान भागवा, शेतीला पाणी द्या आणि स्थानिक पाणीपुरवठ्याचे प्रश्न सोडवा; त्यानंतरच अतिरिक्त पाणी मुंबईला देण्याचा विचार करा, असे म्हटले. कोयना धरणातील पाणी मुंबईला नेण्याबाबत प्राथमिक माहिती मिळाली असली, तरी या प्रस्तावाचा अधिकृत तपशील अद्याप समोर आलेला नाही. कोकणातील अनेक गावांना आजही पाण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे स्थानिक गरजांकडे दुर्लक्ष करून पाणी मुंबईकडे वळवण्याचा निर्णय घेऊ नये, असे निकम यांनी स्पष्ट केले.
कोकणातील पाणीटंचाई असलेल्या गावांपर्यंत पाणी पोहोचवण्यासाठी पालकमंत्र्यांनी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून दिला आहे. तसेच सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्याची जबाबदारी आयआयटीकडे सोपवण्यात आल्याची माहितीही निकम यांनी दिली. कोकणचा हा महत्त्वाचा प्रश्न आगामी विधिमंडळ अधिवेशनात ठामपणे मांडणार असल्याचे त्यांनी सांगितले.
Koyna Water : कोयनेचं पाणी मुंबईला देण्याच्या चर्चेला पूर्णविराम? मुख्यमंत्री फडणवीसांचा खुलासा; म्हणाले, 'कुठलंही पाणी...'
शिंदेंच्या शिवसेनेच्या रायगड जिल्हा परिषद अध्यक्षा अस्मिता केंद्रे यांनीही कोयनेचे पाणी मुंबईला वळवण्याच्या प्रस्तावाला ठाम विरोध दर्शवला आहे. सर्वप्रथम कोकणातील जनतेला आणि येथील उद्योगांना पाणी उपलब्ध करून द्यावे. रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या तिन्ही जिल्ह्यांचे हित महत्त्वाचे आहे. आधी कोकण पाण्याच्या बाबतीत समृद्ध झाले पाहिजे आणि त्यानंतरच कोयनेचे अवजल मुंबईला देण्याचा निर्णय घ्यावा, असे त्यांनी म्हटले.
शासनाची भूमिका पूर्णपणे चुकीची आहे, असे आपण म्हणणार नाही; मात्र कोणताही निर्णय घेण्यापूर्वी कोकणातील जनतेची तहान भागवणे गरजेचे आहे, असे केंद्रे यांनी स्पष्ट केले. कोकणातील नागरिक, शेती, स्थानिक व्यवसाय आणि मोठे उद्योग पाण्यावर अवलंबून आहेत. उन्हाळ्यात अनेक भागांत पाणीटंचाई जाणवते, तर औद्योगिक विकासासाठीही मोठ्या प्रमाणात पाण्याची गरज आहे. त्यामुळे कोकणाच्या गरजा पूर्ण केल्याशिवाय पाणी मुंबईकडे वळवणे अन्यायकारक ठरेल, अशी भूमिका त्यांनी मांडली.
कोकणच्या हक्काच्या पाण्यासाठी वेळप्रसंगी संघर्ष करावा लागला किंवा रस्त्यावर उतरावे लागले, तरी मागे हटणार नाही, असा इशाराही अस्मिता केंद्रे यांनी दिला. सध्या कोयनेचे पाणी मुंबईला वळवण्याच्या प्रस्तावाला आपला ठाम विरोध असल्याचे सांगत त्यांनी स्थानिक जनभावना व्यक्त केली. कोकणात दरवर्षी मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो. मात्र, पाण्याचे योग्य नियोजन नसल्याने बहुतांश पाणी थेट समुद्राला जाऊन मिळते.
हे पाणी अडवून त्याचा उपयोग स्थानिक शेती, पिण्याच्या पाण्याच्या योजना, उद्योग आणि वीजनिर्मितीसाठी करणे आवश्यक आहे. नद्या, धरणे आणि बंधाऱ्यांचे शास्त्रीय पद्धतीने नियोजन केल्यास कोकणातील पाणीटंचाईचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवता येऊ शकतो, असेही केंद्रे यांनी म्हटले. दरम्यान, या प्रस्तावाला माजी सभापती शौकत मुकादम यांनीही विरोध दर्शवला आहे. कोकणातील जिल्ह्यांमधील नागरिकांची तहान भागवल्याशिवाय कोयनेचे पाणी मुंबईला नेऊ देणार नसल्याची भूमिका त्यांनी मांडली आहे.
Koyna Water Dispute : सतेज पाटील 'गोकुळ'नंतर कोयनेच्या पाण्यासाठी रस्त्यावर उतरणार? फडणवीस सरकारला थेट इशारा, म्हणाले "आमच्या हक्काचं पाणी..."
एकीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोयना प्रकल्पातील वीजनिर्मितीनंतर समुद्राकडे वाहून जाणाऱ्या पाण्याबाबत सरकार अभ्यास करत असल्याचे सांगितले आहे. तर दुसरीकडे महायुतीतील राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या नेत्यांसह स्थानिक लोकप्रतिनिधींकडून या प्रस्तावाबाबत विरोधाची भूमिका घेतली जात आहे. त्यामुळे कोयनेच्या पाण्याच्या नियोजनाचा मुद्दा आता केवळ विकासाचा न राहता कोकणच्या हक्काचा आणि राजकीय प्रतिष्ठेचा विषय बनण्याची चिन्हे आहेत. सरकार या प्रस्तावावर अंतिम निर्णय घेताना कोकणातील पाणीटंचाई, शेती आणि उद्योगांच्या गरजांचा कसा विचार करणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
Devendra Fadnavis: यशवंतरावांच्या पुण्यतिथीला फडणवीस गैरहजर; सलग दुसऱ्या वर्षी प्रीतिसंगमाकडे पाठ, कऱ्हाडमध्ये नेमकं काय घडलं?
यशवंतराव चव्हाण यांच्या ४२ व्या पुण्यतिथीनिमित्त कऱ्हाडच्या प्रीतिसंगमावर नेत्यांची उपस्थिती.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सलग दुसऱ्या वर्षी अभिवादनासाठी गैरहजर.
फडणवीसांनी मुंबईतूनच अभिवादन केल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण.
Karad Preetisangam: महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त राज्यातील अनेक दिग्गज नेत्यांनी आज कऱ्हाडच्या प्रीतिसंगमावर हजेरी लावली. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्या भेटीची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची अनुपस्थितीही चर्चेचा विषय ठरली आहे. सलग दुसऱ्या वर्षी फडणवीस पुण्यतिथीनिमित्त यशवंतरावांच्या समाधिस्थळी अभिवादनासाठी आलेले नाहीत.
आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांची आज (बुधवारी) ४२ वी पुण्यतिथी आहे. दरवर्षी २५ नोव्हेंबरला कृष्णा-कोयना नद्यांच्या प्रीतिसंगमावरील यशवंतरावांच्या समाधिस्थळी अभिवादन करण्यासाठी राज्यभरातून नेते कऱ्हाडमध्ये दाखल होतात. राज्याचे मुख्यमंत्री, मंत्रिमंडळातील सदस्य आणि विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या उपस्थितीमुळे या कार्यक्रमाला विशेष महत्त्व असते.
Baramati Crime: विश्वास संपादन केला अन् विद्यार्थिनीवर अत्याचार; शिक्षकाला 20 वर्षांचा तुरुंगवास, 45 हजारांचा दंड
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सलग दुसऱ्या वर्षी पुण्यतिथीच्या दिवशी प्रीतिसंगमावर अभिवादनासाठी आलेले नाहीत. मुंबईतूनच यशवंतराव चव्हाण यांना अभिवादन केले जात असल्याने फडणवीस यांच्या कऱ्हाडमधील अनुपस्थितीची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.
सलग दोन वर्षांच्या अनुपस्थितीमागचे कारण काय?
यशवंतराव चव्हाण यांचे महाराष्ट्राच्या राजकारणातील स्थान कोणत्याही एका राजकीय पक्षापुरते मर्यादित राहिलेले नाही. राज्याच्या जडणघडणीतील त्यांचे योगदान लक्षात घेता विविध विचारधारांच्या पक्षांचे नेते प्रीतिसंगमावर अभिवादनासाठी येतात. त्यामुळे राज्याच्या विद्यमान मुख्यमंत्र्यांनीही पुण्यतिथीनिमित्त समाधिस्थळी उपस्थित राहावे, अशी यशवंतप्रेमींची अपेक्षा आहे.
Sunetra Pawar: रायगडमध्ये सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रवादीची ताकद वाढली; भाजप-शिवसेनेतील 100 पदाधिकाऱ्यांचा पक्षप्रवेश
फडणवीस यांनी मुंबईतून यशवंतरावांना अभिवादन केले असले, तरी सलग दोन वर्षे पुण्यतिथीला ते कऱ्हाडमध्ये का आले नाहीत, असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यांच्या अनुपस्थितीमागचे नेमके कारण मात्र स्पष्ट झालेले नाही.
Maharashtra Live Political Update: शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणी सुनावणी सुरू; कपिल सिब्बल यांचा सलग दुसऱ्या दिवशी युक्तिवाद
शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणी सुनावणी सुरू; कपिल सिब्बल यांचा सलग दुसऱ्या दिवशी युक्तिवाद
शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हावरील वादाची न्यायालयीन सुनावणी आज पुन्हा सुरू झाली आहे. शिंदे गटाचे वकील ध्रुव मेहता यांच्या युक्तिवादानंतर ठाकरे गटाचे ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल सलग दुसऱ्या दिवशी बाजू मांडत आहेत. या सुनावणीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
पुण्यातील कोर्टाबाहेरच्या गोळीबारातील पहिल्या आरोपीची ओळख पटली; कात्रजमधील हत्या प्रकरणाचं कनेक्शन समोर
पुण्यातील शिवाजीनगर सत्र न्यायालयाबाहेर झालेल्या गोळीबार आणि कोयत्याने हल्ला प्रकरणाला आता नवे वळण मिळाले आहे. या हल्ल्यामागील कारण समोर आले असून, कात्रजमधील शुभम चव्हाण हत्या प्रकरणाशी या घटनेचे कनेक्शन असल्याची माहिती समोर आली आहे. वर्षभरापूर्वी झालेल्या हत्येचा बदला घेण्यासाठी हा हल्ला करण्यात आल्याचा प्राथमिक तपासात संशय व्यक्त केला जात आहे. दरम्यान, या प्रकरणातील पहिल्या आरोपीची ओळख पटल्याची माहिती आहे.
शिवाजीनगर कोर्टाबाहेरील गोळीबार पूर्ववैमनस्यातून; मंदार किवळे जखमी
पुण्यातील शिवाजीनगर न्यायालयासमोरील गोळीबार आणि हल्ला प्रकरणात पूर्ववैमनस्यातून हल्ला झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या घटनेत मंदार मारुती किवळे हा तरुण जखमी झाला असून, त्याच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत. विशेष म्हणजे, मंदार तीन दिवसांपूर्वीच कारागृहातून बाहेर आला होता.
पुण्यात अतिक्रमणविरोधी कारवाई सलग आठव्या दिवशीही सुरू
पुणे महानगरपालिकेने शहरातील बेकायदा अतिक्रमणांविरोधात उगारलेला कारवाईचा बडगा आज सलग आठव्या दिवशीही कायम आहे. आज गंगाधाम चौकातील आई माताजी मंदिरापासून ते कान्हा हॉटेलपर्यंतच्या भागातील अतिक्रमणे हटवण्याची धडक मोहीम राबवण्यात येत आहे. शहरातील विविध भागांत सुरू असलेली ही जोरदार कारवाई आगामी काळातही अशीच सुरू राहणार असल्याचे महापालिका प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
पुणे न्यायालयासमोर काही वेळापूर्वी गोळीबार आणि कोयत्याने वार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या हल्ल्यामुळे न्यायालय परिसरात मोठी खळबळ उडाली असून बाहेर बघ्यांची मोठी गर्दी जमली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले आहेत. विशेष म्हणजे, दोन दिवसांपूर्वीच न्यायालय उडवून देण्याची धमकी मिळाली होती, त्यामुळे या घटनेने सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे.
सोलापूरकरांना मोठा दिलासा;  १,३५० कोटींच्या योजनेला मंजुरी
सोलापूर: तीव्र दुष्काळाच्या संकटात सापडलेल्या सोलापूर शहराला राज्य सरकारने मोठा दिलासा दिला आहे. शहराचा पाणीपुरवठा अधिक सक्षम करण्यासाठी १,३५० कोटी रुपयांच्या सुधारित पाणीपुरवठा योजनेला मुख्य सचिवांकडून प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे आगामी काळात सोलापूरकरांची पाणीटंचाईची समस्या कायमस्वरूपी मार्गी लागण्यास मोठी मदत होणार आहे.
त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग मंदिराचे दर्शन अडीच महिने बंद राहणार?
आगामी सिंहस्थ कुंभमेळा २०२७ च्या पूर्वतयारी आणि विकासकामांच्या पार्श्वभूमीवर श्री त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग मंदिराचे दर्शन तब्बल अडीच महिने बंद ठेवण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाने (MSIDC) यासंदर्भातील अधिकृत प्रस्ताव जिल्हा प्रशासन आणि कुंभमेळा प्राधिकरणाकडे सादर केला आहे. या प्रस्तावावर प्रशासन काय अंतिम निर्णय घेते, याकडे आता सर्व भाविकांचे आणि स्थानिकांचे लक्ष लागले आहे.
लातूर जिल्हा बँक अध्यक्षपदी धीरज देशमुख
लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी धीरज देशमुख तर उपाध्यक्षपदी अविनाश बाळासाहेबजी जाधव यांची बिनविरोध निवड झाली आहे. नुकत्याच झालेल्या जिल्हा बँकेच्या निवडणुकीत धीरज देशमुख यांच्या नेतृत्वाखालील सहकार पॅनलला बहुमत मिळाले होते. 19 पैकी 15 जागांवर 'सहकार'ने मिळवल्या होत्या.
गेली पाच वर्ष धीरज देशमुख यांच्याकडेच जिल्हा बँकेचे अध्यक्षपद होते. आता दुसऱ्यांदा त्यांच्याकडे अध्यक्षपद आले आहे.
आमदार मंगेश चव्हाण यांच्यावर कारवाई करा - दिलीप खोडपे
सत्तेचा गैरवापर करून उमेदवारांना बाद करण्याचे अनैतिक राजकारण आमदार मंगेश चव्हाण करीत  आहेत, असा आरोप करत शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने पोलिसांना आमदार चव्हाण यांच्या विरोधात गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली. याबाबत पोलिसांनी कारवाई न केल्यास आंदोलनाचा इशाराही दिलीप खोडपे यांनी दिला आहे.
'गोकुळ'ची आज कोर्टात सुनावणी
गेल्या सहा महिन्यांपासून सुरू असलेल्या गोकुळ दूध संघाच्या सत्ता संघर्षाचा निकाल आज दुपारपर्यंत लागणे शक्य आहे. कोरम अभावी निर्माण झालेल्या पेचामुळे महायुतीकडून चार शासन नियुक्त संचालकांच्या आदेशाला न्यायालयात आव्हान देऊन समविचारी आघाडीकडून अध्यक्ष पदाला देखील आव्हान देण्यात आले आहे. त्याची महत्त्वाची सुनावणी आज दुपारी तीन वाजता पार पडणार आहे. गोकुळच्या सत्ता संघर्षात न्यायालयाची बाजू आणि निकाल महत्त्वाची असून आज कोल्हापूर सर्किट बेंच काय निकाल देणार याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे.
देवराम लांडेंनी मागितली राज ठाकरेंची माफी
राज ठाकरे यांच्याबद्दल अपशब्द वापरत असल्याचा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष देवराम लांडे यांचा व्हिडिओ समोर आला होता. हा व्हिडिओ बनावट असल्याचा दावा लांडे यांनी केला होता. मात्र, यामुळे मनसे कार्यकर्त्यांच्या भावना दुखावल्या असतील तर आपण राज ठाकरेंची माफी मागतो, असे ते म्हणाले.
राष्ट्रवादीत इन्कमिंग, 100 जणांनी केला प्रवेश
खोपोली येथे झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या संवाद मेळाव्यात भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.तब्बल 100 जणांनी हाती घड्याळ घेतल्याने रायगडमधील राष्ट्रवादी काँग्रेसची राजकीय ताकद वाढल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
खडसे नाव बाजुला ठेऊन भाजपशी लढा , रक्षा खडसेंचे विरोधकांना आव्हान
जळगाव जिल्हा बँकेच्या निवडणुकीत केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी विरोधकांना खडसावले आहे. प्रत्येक निवडणुकीत खडसे फॅक्टर चर्चेत आणून वादाचा आधार घेतला जातो. मात्र विरोधकांनी खडसे हे नाव बाजूला करून भाजपशी लढावे, असे आव्हान त्यांनी दिले.
महिलेचा विनयभंग करणाऱ्या डॉ. सौरभ बोरसे निलंबीत
डॉ. सौरभ बोरसे याच्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल होऊन आठवडा उलटला तरी कोणतीही प्रशासकीय कारवाई करण्यात आली नव्हती. मात्र, बोरसेवर तत्काळ निलंबनाच्या कारवाईची मागणी नगरसेविका कविता पाटील यांनी आयुक्तांकडे केली होती. त्यानुसार नवी मुंबईचे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी बोरसे यांच्या निलंबणाचे आदेश दिले आहेत.
हिवाळी अधिवेशन किंवा तीन दिवसांचे विशेष अधिवेशन होईल - रामदास आठवले
हिवाळी अधिवेशनाची घोषणा करण्यात आली नाही. मात्र हिवाळी अधिवेशन होईल किंवा तीन दिवसांचे विशेष अधिवेशन होण्याची शक्यता आहे. यामध्ये डिलिमीटेशन बिल आणि महिला आरक्षण बील पास होईल. संजय राऊत यांनी खासदारांना 150 कोटी देऊन खरेदी करून बील पास करण्याचा प्रयत्न असल्याचा दावा देखील आठवले यांनी खोडून काढला. असे कोणालाही पैसे दिलेले नाहीत, डिलिमीटेशन  पार्टीचा व्हिप असल्यामुळे काही लोक विरोधात आहेत मात्र या वेळेला हे बील पास होईल, असे मत केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केले.
वाढदिवशीच 'शहर विद्रुपीकरण पुरस्कार'!
पुणे महापालिकेच्या शहर विद्रुपीकरण पुरस्काराची घोषणा झाली असून, स्थायी समिती अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांच्यासह भाजपचे अतिक्रमणविरोध आंदोलन करणारे नगरसेवक सुनील पांडे आणि पृथ्वीराज सुतार यांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, आज श्रीनाथ भिमाले यांचा वाढदिवस! वाढदिवसाच्या दिवशीच हा अनोखा पुरस्कार जाहीर झाल्याने राजकीय वर्तुळात या घोषणेची चर्चा रंगणार आहे. एकीकडे शहरातील अतिक्रमण हटविण्यासाठी महापालिका प्रशासनाकडून धडक कारवाई सुरू आहे. दुसरीकडे अतिक्रमण कारवाईविरोधात आंदोलन करणाऱ्या लोकप्रतिनिधींनाही या पुरस्काराच्या माध्यमातून लक्ष्य करण्यात आले आहे.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडून यशवंतराव चव्हाण यांना अभिवादन
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी कराडच्या प्रीतीसंगम येथे जात महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांना अभिवादन केलं. तर याचवेळी खासदार सुप्रिया सुळे देखील कराडमधील प्रीतीसंगम येथे अभिवादन करण्यासाठी आल्या होत्या.
2029 च्या लोकसभेला 3 लाखांहून अधिक मताने विजयी होणार - ओमराजे निंबाळकर
धाराशिवमधील एका क्रायक्रमात बोलताना खासदार ओमराजे निंबाळकर यांनी 2024 च्या निवडणुकीत मी 3 लाख 29 हजार 846 मतांच्या फरकाने निवडून आले होते. आता 2029 च्या लोकसभा निवडणुकीत आपण 3 लाख 46 हजार 847 मतांच्या फरकाने निवडून येईल, असा विश्वास व्यक्त केला आहे. शिवाय तुमची कामं केली असतील तरंच तुम्ही मला मतदान करा, असंही त्यांनी म्हटलं आहे.
झिशान सिद्धकी आज राष्ट्रवादीच्या मुंबई अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारणार
राष्ट्रवादीच्या मुंबई अध्यक्षपदाची जबाबदारी आज आमदार झिशान सिद्धकी स्वीकारणार. नियुक्ती पत्र दिल्यानंतर तब्बल २८ दिवसांनंतर राष्ट्रवादीच्या अध्यक्षा सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारणार.
Pune firing case : पुण्यातील कोर्टाबाहेरच्या गोळीबारातील पहिल्या आरोपीची ओळख पटली : कात्रजमधील हत्या प्रकरणाचं कनेक्शन समोर
पुण्यातील शिवाजीनगर सत्र न्यायालयाबाहेर झालेल्या गोळीबार आणि कोयत्याने हल्ला प्रकरणाला आता नवे वळण मिळाले आहे. या हल्ल्यामागील कारण समोर आले असून, कात्रजमधील शुभम चव्हाण हत्या प्रकरणाशी या घटनेचे कनेक्शन असल्याची माहिती समोर आली आहे. वर्षभरापूर्वी झालेल्या हत्येचा बदला घेण्यासाठी हा हल्ला करण्यात आल्याचा प्राथमिक तपासात संशय व्यक्त केला जात आहे. दरम्यान, या प्रकरणातील पहिल्या आरोपीची ओळख पटल्याची माहिती आहे.
शिवाजीनगर न्यायालयासमोरील रस्त्यावर दुपारी 1.15 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. मंदार मारुती किवळे (35) असे हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 2 दुचाकींवरून आलेल्या 4 ते 5 हल्लेखोरांनी मंदारला लक्ष्य केले. सुरुवातीला त्याच्यावर पिस्तुलातून गोळीबार करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, पिस्तुलातून गोळी न सुटल्याने हल्लेखोरांनी कोयत्याने त्याच्यावर सपासप वार केले.
मोठी बातमी! पुण्यात शिवाजीनगर कोर्टाबाहेर भरदिवसा फायरिंग अन् कोयत्याने वार, परिसरात प्रचंड खळबळ!
या हल्ल्यात मंदारचे दोन्ही हात गंभीर जखमी झाले असून, त्याला तातडीने ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच्यावर उपचार सुरू आहेत. हल्ल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पसार झाले.
या हल्ल्यामागे कात्रजमधील शुभम चव्हाण हत्या प्रकरणाचा बदला असल्याचा संशय आहे. 2025 मध्ये मालमत्तेच्या वादातून शुभम चव्हाण याची हत्या करण्यात आली होती. संतोषनगर परिसरातील रहिवासी असलेल्या शुभमचा शेजारील जमिनीवरून अमर साकोरे याच्यासोबत वाद होता. याच वादातून लाकडी ओंडके, बांबूच्या काठ्या आणि स्टंपने मारहाण करून त्याची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी आंबेगाव पोलिसांनी 4 आरोपींना अटक केली होती.
लाडक्या बहिणींनो, 1 चूक अन् 1500 रुपये तर सोडाच, बँकेतील सगळे पैसे गायब होतील! काय आहे e-KYC चं सत्य?
दरम्यान, शुभमच्या हत्येचा बदला घेण्यासाठी त्याच्या सहकाऱ्यांकडून नियोजन सुरू असल्याचा तपास यंत्रणांना संशय आहे. मंदार किवळे हा या हत्या प्रकरणातील आरोपी असून, तो 4 ते 5 दिवसांपूर्वीच जामिनावर तुरुंगातून बाहेर आला होता. त्याच्या सुटकेची माहिती मिळाल्यानंतर हल्लेखोरांनी त्याच्यावर पाळत ठेवून त्यानुसार त्याच्यावर एक ते दोन दिवसांपासून आरोपींनी "ट्रॅप" तयार केला होता
न्यायालयीन कामकाजासाठी मंदार शिवाजीनगरला आल्यानंतर पाळत ठेवलेल्या आरोपींनी गोळीबार करत कोयत्याने वार केले. या प्रकरणाचा तपास स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेचे पथक करत आहे. हल्ल्यात सहभागी असलेल्या इतर आरोपींचा शोध सुरू असून, या हल्ल्यामागील नेमके सूत्रधार आणि कटाचा तपशील तपासातून स्पष्ट होणार आहे.
Rahul Gandhi assets case : राहुल गांधींच्या संपत्तीच्या चौकशीला सुप्रीम कोर्टाचा ब्रेक! CBI-ED तपासाचा आदेश रद्द; दिलासा तरी, टांगती तलवार कायम
Rahul Gandhi assets investigation : कर्नाटकमधील भाजप कार्यकर्ते एस. विग्नेश शिशिर यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी आणि त्यांच्या कुटुंबीयांकडे ज्ञात उत्पन्नापेक्षा जास्त संपत्ती असल्याचा आरोप करणारी याचिकेत सर्वोच्च न्यायालयाने मोठा निर्णय दिला आहे.
राहुल गांधी यांच्या संपत्तीबाबत CBI, ED चौकशीचा आदेश देणारा अलाहाबाद हायकोर्टाच्या लखनौ खंडपीठाचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने रद्द केला. परंतु नव्याने प्रकरणाची सुनावणी घेताना, राहुल गांधी यांना पक्षकार करून त्यांची बाजू ऐकून घ्यावी, असे निर्देश दिले. यावरून राहुल गांधी यांच्याविरोधात न्यायालयीन लढाई सुरूच राहणार आहे.
भाजप (BJP) कार्यकर्ते एस. विग्नेश शिशिर यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी आणि त्यांच्या कुटुंबीयांकडे बेहिशोबी मालमत्ता असल्याचा आरोप होता. या आरोपाच्या चौकशीसाठी, CBI आणि ED मार्फत चौकशी व्हावी, यासाठी मे 2026 मध्ये अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनौ खंडपीठात याचिका दाखल केली होती.
राहुल गांधी (Rahul Gandhi) यांचा विदेश दौऱ्यांवर उत्पन्नापेक्षा अधिक खर्च झाला आहे. सुमारे 60 कोटी रुपयांवर खर्च झाला आहे. ही रक्कम त्यांच्या उत्पन्नांपेक्षा अधिक आहे, असा दावा याचिकेत करण्यात आला होता. यावर लखनौ खंडपीठाने CBI आणि EDला तक्रारीची पडताळणी करून प्रगती अहवाल सादर करण्याचा आदेश दिला होता. 20 जुलैला CBIच्या प्रतिज्ञापत्रावर असमाधान व्यक्त करत नवीन अहवाल मागवला होता.
RBI Repo Rate Hike : RBI रेपो दरवाढीबाबत 'SBI'चा यू-टर्न! अर्धा टक्का नाही, आता पाव टक्क्याचाच अंदाज; 'EMI'बाबत काय संकेत?
सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश सूर्य कांत, न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची आणि न्यायमूर्ती व्ही. मोहना यांच्या खंडपीठाने अलाहाबाद उच्च न्यायालयाला या प्रकरणातील सर्व कायदेशीर मुद्द्यांवर नव्याने विचार करण्यास सांगितले आहे. राहुल गांधी यांच्या वतीने ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडली.
PT Usha Election : ऑलिम्पिक संघटनेत पी. टी. उषा यांचा पत्ता कट! पहिल्या महिला अध्यक्षांची निवडणुकीतून माघार; खुर्चीसाठी तिघांमध्ये लढत
याचिकाकर्त्याचा या प्रकरणाशी कोणताही थेट संबंध नसून, ही याचिका केवळ राजकीय हेतूने आणि कायद्याच्या प्रक्रियेचा गैरवापर करून दाखल करण्यात आली आहे. यापूर्वी 17 ऑगस्ट 2026 रोजी सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाच्या कामकाजाला अंतरिम स्थगिती दिली होती. उच्च न्यायालयाने पूर्वी कोणताही आदेश देण्यापूर्वी राहुल गांधी यांची बाजू ऐकून घेतली नव्हती, यावर कपिल सिब्बल यांनी युक्तिवादात लक्ष वेधले. आणि याच मुद्द्याची सर्वोच्च न्यायालयाने दखल घेतली.
आता उच्च न्यायालयाने या प्रकरणात राहुल गांधी यांना पक्षकार करून त्यांची बाजू ऐकून घ्यावी, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. यानुसार या प्रकरणाची आता नव्याने उच्च न्यायालयाच्या खंडपीठात सुनावणी होणार आहे.
BJP-Akali Alliance : भाजपला अकाली दलाची गरज का? युतीमागे अमित शाहांची रणनीती, सत्तेत परण्याचा मार्ग मोकळा!
कोमल जाधव
Panjab Politics : पंजाबच्या विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने पुन्हा जुन्या मित्राकडे मैत्रीचा हात पुढे केला. आणि मित्राने सुद्धा तो हात हातात घेतला. जवळपास सहा वर्षांपूर्वी कृषी कायद्यांच्या मुद्द्यावरून तुटलेली शिरोमणी अकाली दल आणि भाजप ही युती आता पुन्हा जुळली आहे. पण भाजपला अचानक अकाली दलाची गरज का भासली? पंजाबमध्ये स्वबळावर विस्तार करण्याची भूमिका घेणाऱ्या भाजपनं पुन्हा युतीचा पर्याय का निवडला? यामागे पंजाबचं नेमकं राजकीय गणित काय आहे? सगळे समजून घेऊया
भाजप आणि अकाली दलाची युती ही काही वर्षांपुरती मर्यादित नव्हती. जवळपास 25 वर्षं हे दोन्ही पक्ष एकत्र होते. या युतीमध्ये अकाली दल हा मोठा भागीदार होता, तर भाजप प्रामुख्यानं शहरी मतदारसंघांमध्ये निवडणूक लढवत होता. 117 जागांच्या पंजाब विधानसभेत अकाली दल 94, तर भाजप 23 जागांवर युतीमध्ये लढत होते.
म्हणजेच पंजाबच्या ग्रामीण भागात आणि शीख मतदारांमध्ये अकाली दलाचे असलेलं पारंपरिक राजकीय अस्तित्व, तर शहरी भागात भाजपची ताकद, असे या युतीचे गणित होते. मात्र, 2020 मध्ये केंद्र सरकारने आणलेल्या तीन कृषी कायद्यांवरून पंजाबमध्ये शेतकरी आंदोलन तीव्र झालं. या कायद्यांना अकाली दलाने विरोध केला आणि अखेर सप्टेंबर 2020 मध्ये भाजपसोबतची युती तोडली. त्यानंतर दोन्ही पक्ष स्वतंत्रपणे राजकीय वाटचाल करत होते. मात्र, या वाटचालीत आता थेट राजकीय अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे.
स्वतंत्रपणे लढणाऱ्या या पक्षांची पंजाबच्या राजकारणात पिछेहाट झाली. 2022 च्या पंजाब विधानसभा निवडणुकीत भाजपला केवळ दोन जागा मिळाल्या, तर अकाली दलाला तीन जागा मिळाल्या. म्हणजेच दोन्ही पक्ष स्वतंत्रपणे लढले, पण त्यांना अपेक्षित यश मिळालं नाही. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने पंजाबमध्ये स्वतंत्रपणे निवडणूक लढवली. पक्षाला सुमारे 18.5 टक्के मतं मिळाली, मात्र 13 पैकी एकही जागा जिंकता आली नाही. दुसरीकडे अकाली दलाच्या हरसिमरत कौर बादल यांनी भटिंडा मतदारसंघातून विजय मिळवला. म्हणजेच भाजपला पंजाबमध्ये मतांचा काही आधार मिळत असला, तरी त्याचं विधानसभा जागांमध्ये रूपांतर करण्याचं आव्हान कायम आहे, हेच ओळखून पुन्हा जुने मित्र एकत्र आले आहेत.
अकाली दलाचा पारंपरिक मतदारवर्ग
पंजाबमध्ये शेतकरी आणि शीख मतदारांचे राजकीय महत्त्व मोठे आहे. अकाली दलाला ग्रामीण भागात आणि शीख मतदारांमध्ये ऐतिहासिक राजकीय आधार राहिला आहे. भाजपला या मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी अकाली दलाची संघटनात्मक ताकद आणि स्थानिक नेत्यांचे जाळे उपयोगी पडू शकते, असं राजकीय विश्लेषण आहे. भाजपची शहरी भागातील ताकद आणि अकाली दलाचा ग्रामीण भागातील प्रभाव एकत्र आणण्याचा प्रयत्न या युतीतून होऊ शकतो. मात्र, भाजपसाठी ही युती केवळ अकाली दलाचा मतदारवर्ग मिळवण्यापुरती मर्यादित नाही. पंजाबमध्ये आम आदमी पक्षाचं सरकार आहे, तर काँग्रेसही प्रमुख विरोधी पक्ष म्हणून मैदानात आहे. अशा परिस्थितीत सत्ताधारी आप आणि काँग्रेसला आव्हान देण्यासाठी विरोधी मतांचं विभाजन टाळणे, हा युतीमागचा एक राजकीय विचार आहे.
BJP Akali Dal Alliance : ज्या भाजपला 'शीख संस्थांवर कब्जा करणारा' म्हणाले, त्याच भाजपच्या चरणी बादल कुटुंब! भगवंत मान यांचा घणाघात
सत्तेत परण्याचा मार्ग मोकळा
व्होटर वाइबने नुकत्याच केलेल्या सर्व्हेमध्ये पंजाबमध्ये आम आदमी पक्षाला तब्बल 33.5 टक्के मतं मिळण्याची शक्यता आहे. तर, काँग्रेसला 27.6 टक्के मते मिळणार आहे. तर, भाजपला 14 टक्के आणि अकाली दलला 12.5 टक्के मतं मिळत असल्याचे दिसत आहे. वारिस पंजाब दे या पक्षाला देखील 8 टक्के मत मिळत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे अकाली दल आणि भाजप एकत्र आल्याने त्यांच्या मतांची टक्केवारी 28 च्या पुढे जाईल. आणि आपला टक्कर देऊन सत्तेत येऊ शकतात, अशी चर्चा आहे.
युतीसमोर आव्हान?
2020 मध्ये कृषी कायद्यांच्या मुद्द्यावरून दोन्ही पक्ष वेगळे झाले होते. शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर भाजपबद्दल निर्माण झालेला अविश्वास दूर करणं हे एक आव्हान असेल. त्याचबरोबर भाजपमधील काही जुन्या नेत्यांचा अकाली दलासोबत पुन्हा युती करण्याला विरोध असल्याच्याही चर्चा होती. त्यामुळे केवळ जागावाटपच नव्हे, तर दोन्ही पक्षांमधील स्थानिक पातळीवरील समन्वयही महत्त्वाचा ठरणार आहे.
पंजाबमध्ये भाजपला आपला राजकीय विस्तार करायचा आहे, तर अकाली दलाला पुन्हा आपलं राजकीय अस्तित्व मजबूत करायचं आहे. भाजपला अकाली दलाचा पारंपरिक मतदारवर्ग आणि संघटनात्मक ताकद हवी आहे, तर अकाली दलाला भाजपची राष्ट्रीय पातळीवरील ताकद आणि निवडणूक व्यवस्थापनाचा फायदा मिळू शकतो. मात्र, या युतीचं खरं यश ठरणार आहे ते जागावाटप, शेतकरी मतदारांचा प्रतिसाद आणि दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमधील समन्वयावर आहे. त्यातूनच ही युती सत्ताधारी आप आणि प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसपुढे आव्हान उभे करणार की नाही हे ठरणार आहे.
Amarinder Singh : माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह थेट सोनिया गांधींच्या दरबारात! पंजाब निवडणुकीआधी घरवापसीच्या चर्चांना उधाण
Sunil Tatkare : शिवसेनेला भिडणाऱ्या सुधाकर घारेंसाठी सुनील तटकरेंचा प्लॅन; आठव्या विधानसभा जागेचे संकेत देत दिले मोठे आश्वासन
Raigad Political News : रायगड जिल्ह्यात महायुतीमधील अंतर्गत मतभेद दिवसेंदिवस वाढताना दिसत आहेत. शिंदेंची शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातील संघर्ष आता अधिक तीव्र झाला आहे. यापूर्वी पालकमंत्रीपदावरून दोन्ही पक्षांमध्ये वाद निर्माण झाला होता. आता कर्जत तालुक्यातील प्रस्तावित टोरंट पॉवर प्रकल्प, इथेनॉल प्रकल्प आणि खालापूरमधील एका कारखान्याच्या मुद्द्यावरून दोन्ही पक्षांतील संघर्ष पुन्हा उफाळून आला आहे.
कर्जतचे शिवसेना आमदार महेंद्र थोरवे आणि अलिबाग-मुरुडचे आमदार महेंद्र दळवी हे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि त्यांच्या कुटुंबीयांवर टीका करताना दिसत आहेत. दुसरीकडे, शिवसेना नेत्यांच्या टीकेला प्रत्युत्तर देण्याची भूमिका राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे आणि पक्षाचे पदाधिकारी घेत आहेत. विशेषतः थोरवे यांच्या टीकेला घारे त्याच भाषेत उत्तर देत असल्याने रायगडमधील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.
थोरवे आणि तटकरे यांच्यातील वादानेही आता टोक गाठले आहे. काही दिवसांपूर्वी महेंद्र थोरवे यांनी राष्ट्रवादीचे आमदार अनिकेत तटकरे यांना राजीनामा देण्याचे खुले आव्हान दिले होते. तसेच, आपण आपल्या मुलाला निवडणुकीच्या मैदानात उतरवू, असेही त्यांनी म्हटले होते. विशेष म्हणजे, अनिकेत तटकरे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करताना सुनील तटकरे स्वतः उपस्थित होते.
Sunil Tatkare : टोरंट प्रकल्पावरून महायुतीत मतभेद? सुनील तटकरेंनी केली सरकारचं टेन्शन वाढवणारी मागणी
दरम्यान, सुधाकर घारे यांनीही थोरवेंना थेट प्रत्युत्तर दिले आहे. २०२९ च्या निवडणुकीची वाट पाहा, असा इशारा देतानाच, पक्षाचा एबी फॉर्म मिळाला नाही आणि सुनील तटकरे यांचा आशीर्वाद पाठीशी राहिला तरी आपण निवडणुकीसाठी तयार असल्याचे संकेत त्यांनी दिले. थोरवे यांनी तटकरे यांच्यावर जेव्हा जेव्हा टीका केली, तेव्हा तेव्हा घारे यांनी त्याला प्रत्युत्तर दिले आहे. त्यामुळे दोन्ही पक्षांतील राजकीय संघर्षात घारे यांची भूमिका महत्त्वाची ठरत आहे.
या पार्श्वभूमीवर आता सुधाकर घारे यांच्यासाठी सुनील तटकरे यांनी नवा राजकीय डाव आखल्याची चर्चा सुरू झाली आहे. मात्र, हा निर्णय आगामी मतदारसंघ पुनर्रचना आणि महायुतीच्या राजकीय निर्णयांवर अवलंबून असणार आहे. काही दिवसांपूर्वी तटकरे यांनी लोकसंख्येच्या प्रमाणात लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघांची संख्या वाढवण्याची मागणी केली होती. त्यानंतर माणगाव येथे बोलताना त्यांनी रायगड जिल्ह्याच्या संभाव्य विभाजनावर भाष्य केले होते. नवीन जिल्हा निर्माण झाल्यास माणगाव येथे मुख्यालय करण्याचा शब्दही त्यांनी दिला होता. त्यांच्या या विधानाची राज्यभर चर्चा झाली होती.
आता खोपोली येथे आयोजित राष्ट्रवादी काँग्रेसच्या संवाद मेळाव्यात सुनील तटकरे यांनी सुधाकर घारे यांच्याबाबत महत्त्वाचे संकेत दिले. आगामी मतदारसंघ पुनर्रचनेत रायगड जिल्ह्याला आठवा विधानसभा मतदारसंघ मिळाल्यास त्या जागेसाठी महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांकडे सुधाकर घारे यांची उमेदवारी मागणार असल्याचे सूतोवाच त्यांनी केले. तटकरे यांनी जाहीरपणे दिलेल्या या संकेतांमुळे रायगडच्या राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना सुरुवात झाली आहे.
सध्या रायगड जिल्ह्यात सात विधानसभा मतदारसंघ आहेत. भविष्यात मतदारसंघ पुनर्रचनेनंतर जागांची संख्या वाढल्यास जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता आहे. नव्याने निर्माण होणाऱ्या मतदारसंघावर कोण दावा करणार आणि महायुतीकडून कोणाला उमेदवारी मिळणार, याबाबत आतापासूनच चर्चा सुरू झाली आहे.
Sunil Tatkare : दादांच्या पुतळा अनावरण कार्यक्रमाला राष्ट्रवादीच्या दिग्गज नेत्यांची दांडी; तटकरेंनी कारणचं सांगितलं
याच पार्श्वभूमीवर तटकरे यांनी सुधाकर घारे यांच्यासाठी आठव्या विधानसभा मतदारसंघाची जागा मागण्याचे संकेत दिल्याने घारे यांच्या राजकीय भवितव्याबाबत उत्सुकता वाढली आहे. रायगडमधील महायुतीच्या राजकारणात घारे यांची वाढती भूमिका पाहता तटकरे यांचे हे विधान महत्त्वाचे मानले जात आहे. मात्र, रायगड जिल्ह्याला प्रत्यक्षात आठवा विधानसभा मतदारसंघ मिळणार का आणि तो निर्माण झाल्यास महायुतीकडून उमेदवारी कोणाला मिळणार, हे आगामी मतदारसंघ पुनर्रचना आणि राजकीय घडामोडींनंतरच स्पष्ट होणार आहे.
लाडक्या बहिणींनो, 1 चूक अन् 1500 रुपये तर सोडाच, बँकेतील सगळे पैसे गायब होतील! काय आहे e-KYC चं सत्य?
Mazi Ladki Bahin Yojana e-KYC
बनावट e-KYC लिंकपासून सावध!
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या नावाने सध्या बनावट e-KYC लिंक व्हायरल होत आहे. या लिंकवर क्लिक केल्यास वैयक्तिक माहिती आणि बँक खात्याच्या सुरक्षेला धोका निर्माण होऊ शकतो.
Ladki Bahin Yojana e-KYC
नंदुरबारमध्ये प्रकार उघड
नंदुरबार जिल्ह्यात लाडकी बहीण योजनेच्या नावाने नवीन e-KYC लिंक समोर आली आहे. मात्र ही लिंक बनावट असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
सरकारकडून कोणताही आदेश नाही!
योजनेसाठी नव्याने e-KYC सुरू झाल्याच्या चर्चा सोशल मीडियावर आहेत. मात्र याबाबत शासनाकडून कोणतेही अधिकृत निर्देश प्राप्त झालेले नाहीत.
Mazi Ladki Bahin Yojana e-KYC
एका क्लिकने होऊ शकते फसवणूक
अनोळखी लिंक उघडल्यास सायबर भामटे तुमची गोपनीय माहिती मिळवण्याचा प्रयत्न करू शकतात. त्यामुळे अशा लिंकपासून दूर राहा.
ही माहिती अजिबात देऊ नका
आधार क्रमांक, बँक खाते तपशील, ATM PIN, पासवर्ड किंवा मोबाईलवर आलेला OTP कोणालाही सांगू नका.
1500 रुपयांच्या आमिषाला बळी पडू नका
योजनेचे पैसे सुरू ठेवण्यासाठी किंवा मिळवण्यासाठी तातडीने लिंकवर माहिती भरा, असे सांगणाऱ्या मेसेजवर विश्वास ठेवू नका.
Ladki Bahin Yojana
अधिकृत माहिती कुठे मिळेल?
योजनेतील बदल किंवा e-KYC बाबतची माहिती शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर आणि स्थानिक प्रशासनाकडूनच तपासा.
Mazi Ladki Bahin Yojana scam
इतर महिलांनाही सावध करा!
बनावट लिंकवर क्लिक करू नका आणि संशयास्पद मेसेज पुढे पाठवू नका. स्वतः सुरक्षित राहा आणि लाडक्या बहिणींनाही या सायबर फसवणुकीपासून सावध करा.
Farmer ID e-KYC
Next : शेतकऱ्यांनो, मोबाईलवरून 5 मिनिटांत फार्मर आयडी e-KYC करा; पाहा Step-by-Step संपूर्ण प्रक्रिया!
RBI Repo Rate Hike : RBI रेपो दरवाढीबाबत 'SBI'चा यू-टर्न! अर्धा टक्का नाही, आता पाव टक्क्याचाच अंदाज; 'EMI'बाबत काय संकेत?
SBI Repo Rate Forecast : रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) डिसेंबरमध्ये होणाऱ्या पतधोरण आढाव्यात रेपो दरात किती वाढ करणार, याकडे अर्थविश्वाचे लक्ष लागले आहे. दरम्यान, स्टेट बँक ऑफ इंडियाच्या (SBI) अर्थतज्ज्ञांनी अर्धा टक्का रेपो दरवाढ करण्याच्या निर्णयाबाबत सावधगिरीचा इशारा दिला आहे.
अर्धा टक्का दरवाढ केल्यास देशातील आर्थिक स्थैर्याला धोका निर्माण होण्यासोबतच आर्थिक विकासावरही प्रतिकूल परिणाम होऊ शकतो. त्यामुळे पाव टक्का दरवाढ पुरेशी ठरेल, असा सुधारित अंदाज स्टेट बँकेच्या अर्थतज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.
आंतरराष्ट्रीय पातळीवरील आर्थिक अस्थिरता, इंधनाच्या किमतींमधील वाढ, देशातील महागाई आणि काही राज्यांमधील दुष्काळी परिस्थिती या बाबींचा विचार करून रिझर्व्ह बँकेने (RBI) व्याजदरवाढीचा निर्णय घ्यावा, असे स्टेट बँकेच्या अर्थतज्ज्ञांचे म्हणणे आहे. अर्धा टक्का दरवाढ केल्यास परकीय भांडवली गुंतवणुकीचा ओघ कमी होण्याची किंवा उलटण्याची, रुपयावरील दबाव वाढण्याची आणि आर्थिक घडामोडींना खीळ बसण्याची शक्यता अहवालात व्यक्त करण्यात आली आहे.
विशेष म्हणजे, यापूर्वी स्टेट बँकेच्या (Bank) अर्थतज्ज्ञांनी डिसेंबरच्या पतधोरणात अर्धा टक्का रेपो दरवाढ होण्याचा अंदाज व्यक्त केला होता. मात्र, आता त्यांनी हा अंदाज बदलून पाव टक्क्याच्या दरवाढीची शक्यता वर्तवली आहे. जागतिक आर्थिक परिस्थिती, महागाईचा संभाव्य कल आणि देशांतर्गत आर्थिक घडामोडी लक्षात घेऊन रिझर्व्ह बँकेने निर्णय घ्यावा, अशी भूमिका त्यांनी मांडली आहे.
PT Usha Election : ऑलिम्पिक संघटनेत पी. टी. उषा यांचा पत्ता कट! पहिल्या महिला अध्यक्षांची निवडणुकीतून माघार; खुर्चीसाठी तिघांमध्ये लढत
ऑक्टोबरमधील पतधोरण आढाव्यावेळीही स्टेट बँकेच्या अर्थतज्ज्ञांनी अर्धा टक्का दरवाढीचा अंदाज व्यक्त केला होता. मात्र, प्रत्यक्षात रिझर्व्ह बँकेने पाव टक्क्याचीच वाढ केली होती. त्यावेळी पतधोरणाची भूमिका टप्प्याटप्प्याने कठोर केली जाईल, असे संकेत देण्यात आले होते. गेल्या चार वर्षांतील पहिली रेपो दरवाढ झाल्यानंतर महागाई, इंधन दर आणि रुपयाच्या घसरणीच्या पार्श्वभूमीवर आणखी दरवाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
Shivsena Santosh Pawar missing : 50 लाखांच्या नोटांचा बॉक्स, व्हिडीओ व्हायरल अन् आता शाखाप्रमुख बेपत्ता? संदीप देशपांडे म्हणाले, 'अपहरण तर झाले नाही ना?'
रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीची बैठक 2 ते 4 डिसेंबरदरम्यान होणार आहे. या बैठकीत प्रमुख व्याजदरांबाबत निर्णय घेतला जाईल. दरम्यान, जागतिक आर्थिक परिस्थितीत काही प्रमाणात सुधारणा होत असल्याचे संकेत मिळत आहेत. परकीय गुंतवणुकीचा ओघ वाढत असून रुपयावरील दबावही कमी झाल्याचे चित्र आहे. त्यामुळे रेपो दरात थेट अर्धा टक्का वाढ करण्याऐवजी पाव टक्का वाढ केली जाऊ शकते, असा अंदाज स्टेट बँकेच्या अर्थतज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.
अमेरिकेची मध्यवर्ती बँक फेडरल रिझर्व्हचा अंदाज
दरम्यान, अमेरिकेची मध्यवर्ती बँक फेडरल रिझर्व्ह डिसेंबरमधील पतधोरण आढाव्यात व्याजदर स्थिर ठेवण्याची शक्यता असल्याचेही स्टेट बँकेच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे. अमेरिकेतील शेअर बाजारातील घसरण आणि आर्थिक घडामोडींमधील संभाव्य मंदी यामुळे फेडरल रिझर्व्हसमोर व्याजदरांबाबत निर्णय घेताना पेच निर्माण होऊ शकतो. त्यामुळे अमेरिकेच्या पतधोरणाचा परिणाम जागतिक आर्थिक परिस्थितीवर आणि भारताच्या आर्थिक निर्णयांवरही होण्याची शक्यता आहे.
Raigad Politics : 'AB फॉर्म नको, साहेबांचा फक्त हातच बसं; 2029 साठी तयार रहा! तटकरेंच्या शिलेदाराचं शिवसेनेच्या आमदाराला ओपन चॅलेंज
Raigad News : कर्जतचे शिवसेना आमदार महेंद्र थोरवे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे यांच्यातील राजकीय संघर्ष आता अधिक तीव्र झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे विधान परिषद आमदार अनिकेत तटकरे यांना राजीनामा देण्याचे आव्हान देणाऱ्या महेंद्र थोरवेंना सुधाकर घारे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. "दुसऱ्यांचा राजीनामा मागण्यापूर्वी आधी स्वतःच्या आमदारकीचा राजीनामा द्या. मुलाला कशाला, तुम्ही स्वतः निवडणुकीच्या रिंगणात उतरा. २९ तारखेला तुमची हौस पूर्ण करू," अशा शब्दांत घारे यांनी थोरवेंना खुले आव्हान दिले आहे. त्यांच्या या विधानामुळे रायगडमधील महायुतीतील अंतर्गत संघर्ष पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.
महायुतीतील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील वादाला कर्जत तालुक्यातील प्रस्तावित टोरंट पॉवर प्रकल्प, इथेनॉल प्रकल्प आणि खालापूरमधील एका कारखान्याशी संबंधित मुद्द्यांची पार्श्वभूमी आहे. या प्रकल्पांवरून आमदार महेंद्र थोरवे यांनी खासदार सुनील तटकरे आणि त्यांच्या कुटुंबीयांवर टीका केली होती. तसेच विधान परिषद आमदार अनिकेत तटकरे यांनी आमदारकीचा राजीनामा द्यावा, अशी मागणी केली होती. या वादात शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवी यांनीही तटकरेंविरोधात भूमिका घेतल्याने दोन्ही पक्षांमधील संघर्ष अधिकच वाढला आहे.
३ नोव्हेंबर २०२६ रोजी पोसरी येथे झालेल्या पत्रकार परिषदेत महेंद्र थोरवे यांनी अनिकेत तटकरे यांना थेट आव्हान दिले होते. "एवढीच खुमखुमी असेल, तर आधी आमदारकीचा राजीनामा द्या. मी माझ्या मुलाला तुमच्याविरोधात निवडणुकीच्या रिंगणात उभे करतो," असे आक्रमक विधान त्यांनी केले होते. या विधानामुळे रायगडच्या राजकारणात मोठी चर्चा सुरू झाली होती.
Raigad Politics : गोगावले, थोरवे, दळवी अन् अख्ख्या शिवसेनेपासून सुटका मिळणार? तटकरेंकडून रायगडच्या विभाजनाचा नवा डाव चर्चेत
आता राष्ट्रवादी काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे यांनी या विधानाला प्रत्युत्तर दिले आहे. सुनील तटकरे आणि त्यांच्या कुटुंबीयांवर टीका करणाऱ्यांनी आधी स्वतःची राजकीय स्थिती तपासावी, असा टोला त्यांनी लगावला. दुसऱ्यांचा राजीनामा मागण्याऐवजी महेंद्र थोरवे यांनी स्वतःच्या आमदारकीचा राजीनामा द्यावा, असे खुले आव्हान घारे यांनी दिले.
"साहेबांचा फक्त डोक्यावर हात असू द्या, मग एबी फॉर्म असो किंवा नसो, २९ तारखेला तयार राहा. चितपट करण्याची ताकद आमच्यात आहे," असे म्हणत घारे यांनी थोरवेंना थेट निवडणुकीचे आव्हान दिले. कर्जतच्या आमदारांनी तटकरे कुटुंबीयांवर टीका करताना विचार करायला हवा, असेही ते म्हणाले. थोरवे यांच्यावर टीका करताना त्यांनी, "त्यांना आम्ही भुईसपाट केले आहे," असा दावाही केला.
अनिकेत तटकरे यांच्या राजकीय कारकिर्दीचा दाखला देत घारे यांनी २०१७ मधील निवडणुकीची आठवण करून दिली. त्या वेळी शिवसेना आणि भाजप एकत्र असताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनिकेत तटकरे यांनी विजय मिळवला होता, असे त्यांनी नमूद केले. त्यामुळे त्यांच्या राजकीय ताकदीवर प्रश्न उपस्थित करण्यापूर्वी वस्तुस्थिती लक्षात घ्यावी, असा अप्रत्यक्ष टोला त्यांनी थोरवेंना लगावला.
याशिवाय, आगामी निवडणुकीत अनिकेत तटकरे यांना बिनविरोध निवडून देऊ नये, अशी विनंतीही घारे यांनी तटकरे यांना केली. थोरवे यांनी आपल्या मुलाला अनिकेत तटकरे यांच्या विरोधात निवडणुकीत उतरवण्याचे आव्हान दिले होते. त्यावर प्रत्युत्तर देताना, "मुलाला कशाला, तुम्ही स्वतःच निवडणुकीला उभे राहा. २९ तारखेला तुमची ही हौस पूर्ण करू," असा टोला घारे यांनी लगावला.
एकनाथ शिंदे यांनी स्वतः पक्षप्रमुखपद काढून थोरवे यांच्याकडे दिले आहे, असा त्यांचा समज झाल्याचे दिसते, अशा शब्दांत घारे यांनी आणखी एक राजकीय टोला लगावला. याचवेळी आमदार महेंद्र दळवी आणि मंत्री भरत गोगावले यांच्या मताधिक्याच्या मुद्द्यावरूनही त्यांनी टीका केली.
Raigad Politics : रायगडात अवघ्या आठवडाभरातच राजकीय चित्र बदलले; राष्ट्रवादीत मोठी इनकमिंग! शिवसेनेसह अन्य पक्षांना धक्का
दरम्यान, सुधाकर घारे हे मूळचे राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते असून त्यांनी २०२४ मध्ये अपक्ष म्हणून विधानसभा निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत त्यांचा निसटता पराभव झाला होता. त्यानंतर झालेल्या जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपालिका निवडणुकांमध्ये घारे यांनी थोरवे यांना पराभूत केल्याचा दावा केला जात आहे. त्यामुळे आता सुधाकर घारे यांनी महेंद्र थोरवे यांना दिलेल्या थेट आव्हानाला रायगडच्या राजकारणात विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
मोठी बातमी! पुण्यात शिवाजीनगर कोर्टाबाहेर भरदिवसा फायरिंग अन् कोयत्याने वार, परिसरात प्रचंड खळबळ!
पुण्यातील शिवाजीनगर न्यायालय परिसरात गोळीबाराची धक्कादायक घटना घडल्याने शहरात खळबळ उडाली आहे. न्यायालयाच्या गेट नंबर 4 बाहेर भरदिवसा गोळीबार करण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे, अवघ्या 2 दिवसांपूर्वीच पुणे न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी मिळाली होती. या पार्श्वभूमीवर आता न्यायालयाबाहेर थेट गोळीबार झाल्याने सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
प्राथमिक माहितीनुसार, शिवाजीनगर न्यायालयाच्या गेट नंबर 4 जवळ काही वेळापूर्वी हा प्रकार घडला. यावेळी गोळीबारासोबतच कोयत्याने वार करण्यात आल्याचीही माहिती समोर येत आहे. अचानक घडलेल्या या घटनेमुळे न्यायालय परिसरात एकच गोंधळ उडाला. गोळीबाराचा आवाज ऐकताच परिसरातील नागरिक आणि न्यायालयात आलेल्या लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.
Gokul Milk Union: गोकुळ दूध संघाच्या सत्तेचा आज दुपारपर्यंत फैसला; शासन नियुक्त संचालक अन् अध्यक्षपदाचा तिढा सुटणार!
गोळीबार नेमका कोणत्या कारणातून करण्यात आला, याबाबत अद्याप स्पष्टता आलेली नाही. वैयक्तिक वादातून हा प्रकार घडला की यामागे अन्य काही कारण आहे, याचा तपास पोलीस करत आहेत.
घटनेची माहिती मिळताच पोलीस पथकाने घटनास्थळी धाव घेतली. न्यायालय परिसरात पोलिसांची हालचाल वाढली असून, परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. घटनास्थळाची पाहणी करून गोळीबाराच्या घटनेशी संबंधित माहिती गोळा केली जात आहे.
दरम्यान, दोन दिवसांपूर्वीच पुणे न्यायालयाला बॉम्बस्फोटाची धमकी मिळाल्याची घटना ताजी असतानाच आता न्यायालयाच्या गेटबाहेर गोळीबार झाल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. न्यायालयासारख्या महत्त्वाच्या ठिकाणी अशा घटना घडत असल्याने सुरक्षा व्यवस्थेबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
CET Exam: पहिल्या परीक्षेत कमी गुण मिळाले? चिंता नको! वर्षातून दोनदा CET देण्याची संधी; पहिली सीईटी अनिवार्य, दुसरी ऐच्छिक
Maharashtra CET 2027: व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. आता सीईटी परीक्षेत अपेक्षित गुण न मिळाल्यास विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा प्रयत्न करण्याची संधी मिळणार आहे.
राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने (CET Cell) आगामी शैक्षणिक वर्ष २०२७-२८ पासून राज्यातील ११ व्यावसायिक अभ्यासक्रमांची प्रवेश परीक्षा वर्षातून दोनदा घेण्याचे नियोजन केले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना आपली कामगिरी सुधारून प्रवेशाच्या संधी वाढवता येणार आहेत.
राष्ट्रीय स्तरावरील जेईई परीक्षेच्या धर्तीवर राज्यातही हा बदल करण्यात येत आहे. यासाठी सीईटी सेलने आगामी शैक्षणिक वर्षातील दोन्ही सत्रांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यानुसार पहिल्या सत्रातील परीक्षा २८ जानेवारीपासून सुरू होणार आहे.
या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना एकाच परीक्षेवर अवलंबून राहावे लागणार नाही. पहिल्या प्रयत्नातील कामगिरी समाधानकारक नसेल, तर दुसऱ्या सत्रात पुन्हा परीक्षा देऊन गुण वाढविण्याची संधी उपलब्ध होईल.
Baramati Crime: विश्वास संपादन केला अन् विद्यार्थिनीवर अत्याचार; शिक्षकाला 20 वर्षांचा तुरुंगवास, 45 हजारांचा दंड
कोणत्या ११ अभ्यासक्रमांचा समावेश?
सीईटी सेलने या निर्णयात विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांचा समावेश केला आहे. यामध्ये पीसीएम, पीसीबी, एमबीए, एमएमएस, पीजीडीएम, पीजीसीएम, पाच वर्षांचा एलएलबी, बीएचएमसीटी, बीसीए, बीबीए, बीएमएस आणि बीबीएम या अभ्यासक्रमांचा समावेश आहे. या अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना दोन्ही सत्रांत परीक्षा देण्याचा पर्याय उपलब्ध होणार आहे.
Sunetra Pawar: रायगडमध्ये सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रवादीची ताकद वाढली; भाजप-शिवसेनेतील 100 पदाधिकाऱ्यांचा पक्षप्रवेश
पहिली सीईटी अनिवार्य, दुसरी ऐच्छिक
प्रवेश प्रक्रियेसाठी विद्यार्थ्यांना पहिल्या सत्रातील सीईटी परीक्षा देणे बंधनकारक असणार आहे. मात्र, पहिल्या परीक्षेत अपेक्षित यश न मिळाल्यास किंवा मिळालेले गुण वाढविण्याची इच्छा असल्यास दुसऱ्या सत्रातील परीक्षा देता येईल. दुसऱ्या परीक्षेला बसणे विद्यार्थ्यांसाठी ऐच्छिक ठेवण्यात आले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना आपल्या तयारीनुसार दुसऱ्या प्रयत्नाचा निर्णय घेता येणार आहे.
Teacher News: शिक्षकांचा 1 डिसेंबरपासून  'डिजिटल असहकार'! प्रशासकीय  WhatsApp ग्रुप सोडणार; ऑनलाइन कामांनाही नकार
दोन्ही परीक्षांमधील सर्वोत्तम गुण ग्राह्य
या नव्या नियमातील सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे विद्यार्थ्यांनी दोन्ही सत्रांच्या परीक्षा दिल्यास त्यापैकी ज्या परीक्षेत सर्वाधिक पर्सेंटाइल गुण मिळतील, तेच गुण अंतिम गुणवत्तायादी आणि प्रवेश प्रक्रियेसाठी ग्राह्य धरले जाणार आहेत. म्हणजेच दुसऱ्या परीक्षेत गुण कमी मिळाले तरी पहिल्या परीक्षेतील अधिक गुणांचा लाभ विद्यार्थ्यांना मिळू शकतो. हा नियम शैक्षणिक वर्ष २०२७-२८ पासून लागू होणार आहे.
विद्यार्थ्यांना काय फायदा होणार?
एकाच वर्षात दोनदा परीक्षा घेण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थ्यांवरील मानसिक ताण कमी होण्यास मदत होईल. आजारपण, तांत्रिक अडचणी किंवा अन्य कारणांमुळे पहिल्या परीक्षेत अपेक्षित कामगिरी करता आली नाही, तरी दुसऱ्या संधीचा उपयोग करता येईल. त्यामुळे विद्यार्थ्यांना गुण सुधारण्याची आणि प्रवेशासाठी अधिक चांगली संधी मिळविण्याची मुभा मिळणार आहे.
Teachers News : शिक्षकांची वेतन थकबाकी रखडली, शिक्षक परिषद आक्रमक; थेट मुख्यमंत्र्यांकडे धाव!
Mumbai News : बृहन्मुंबई महापालिका अनुदानित प्राथमिक शाळांमधील तब्बल ३,५८० शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या हक्काच्या सातव्या वेतन आयोगाच्या थकबाकीचा प्रश्न अद्याप प्रलंबित आहे. जानेवारी २०१६ पासूनची वेतन थकबाकी मिळण्याची प्रतीक्षा असताना महापालिका योग्य कार्यवाही करत नसल्याने शिक्षकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
एकीकडे महापालिकेतील प्राथमिक शिक्षकांना २०१७ पासून सातव्या वेतन आयोगाचा लाभ थकबाकीसह मिळत आहे, तर दुसरीकडे त्याच महापालिका क्षेत्रातील अनुदानित शाळांमधील शिक्षकांना मात्र सप्टेंबर २०२३ पासून थकबाकीविना सातवा वेतन आयोग लागू करण्यात आला आहे. हा दुजाभाव नेमका कशासाठी, असा संतप्त सवाल शिक्षकांकडून उपस्थित केला जात आहे.
राज्य शासनाकडून मिळणाऱ्या ५० टक्के अनुदानाची प्रतिपूर्ती प्रलंबित असल्याचे कारण देत मुंबई महापालिकेने अनुदानित शाळांतील शिक्षकांची सातव्या वेतन आयोगाची थकबाकी रोखून धरली आहे. महापालिका प्रशासनाच्या २५ मे २०२३च्या मंजुरीनंतर सप्टेंबर २०२३ पासून सातवा वेतन आयोग लागू झाला. मात्र, जानेवारी २०१६ पासूनची थकबाकी राज्य शासनाकडून ५० टक्के अनुदान प्राप्त झाल्यानंतरच अदा करता येईल, अशी भूमिका महापालिकेने घेतल्याचे संबंधित परिपत्रकातून स्पष्ट होते.
अनुदानित शाळांतील शिक्षकांनीही तेवढ्याच निष्ठेने विद्यार्थ्यांना शिक्षण दिले आहे. मग त्यांच्या हक्काच्या वेतनासाठीच आर्थिक अडचणींचे कारण का पुढे केले जात आहे, असा प्रश्न शिक्षक संघटनांनी उपस्थित केला आहे. या गंभीर प्रश्नावर महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद, मुंबईचे कार्यवाह तथा माजी महापालिका शिक्षण समिती सदस्य शिवनाथ दराडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देऊन तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे.
अनुदानाचे कारण पुढे...
राज्य शासनाच्या २० जानेवारी २०२३ च्या शासन निर्णयानुसार अनुदानित शाळांतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग महापालिकेने स्वनिधीतून लागू करण्यास मान्यता देण्यात आली आहे. तसेच माहिती अधिकारातून मिळालेल्या माहितीनुसार, महापालिकेने प्रथम खर्च करून त्यानंतर राज्य शासनाकडून खर्चाची प्रतिपूर्ती करून घ्यायची असल्याची भूमिका शिक्षण विभागाने मांडली आहे. मग प्रत्यक्ष थकबाकी देण्याच्या वेळी अनुदानाचे कारण पुढे करून शिक्षकांना प्रतीक्षेत का ठेवले जात आहे, असा सवाल उपस्थित होत आहे.
Dawood Ibrahim News : कुख्यात डॉन दाऊद इब्राहिमशी संबंधित इमारतीवर BMC ची बुलडोझर कारवाई; मशिदही पाडली जाणार?
थकबाकी अदा करण्याचे आदेश द्यावेत
शिक्षक परिषदचे कार्यवाह शिवनाथ दराडे यांनी सांगितले की, यापूर्वीही विविध शिक्षक संघटनांनी महापौर, उपमहापौर, शिक्षण समिती अध्यक्ष आणि संबंधित अधिकाऱ्यांकडे पत्रव्यवहार करून तसेच बैठका घेऊन सातत्याने पाठपुरावा केला; मात्र अद्याप ठोस निर्णय झालेला नाही. आता मुख्यमंत्र्यांनीच या प्रकरणात लक्ष घालून जानेवारी २०१६ पासूनची सातव्या वेतन आयोगाची थकबाकी अदा करण्याचे आदेश द्यावेत.
तातडीने निर्णय घेण्याची मागणी
शिक्षक परिषदेचे उपाध्यक्ष आनंत पवार यांनी सांगितले की, मुंबईतील शिक्षकांना शासनाकडून आश्वासन नको, तर हक्काची थकबाकी हवी, राज्य शासन आणि मुंबई महापालिका यांनी एकमेकांकडे बोट दाखवणे थांबवून शिक्षकांच्या प्रलंबित न्याय्य मागण्यांना तातडीने न्याय द्यावा, हीच आता शिक्षकांची अपेक्षा आहे. तरच हा प्रलंबित प्रश्न सुटणार आहे.
BMC News : आधी दिया मिर्झांना विरोध, आता सुरक्षित दिवाळीचा सल्ला! वारिस पठाणांनी रितू तावडेंना सुनावले; म्हणाले, 'आता जाग आली का?'
PT Usha Election : ऑलिम्पिक संघटनेत पी. टी. उषा यांचा पत्ता कट! पहिल्या महिला अध्यक्षांची निवडणुकीतून माघार; खुर्चीसाठी तिघांमध्ये लढत
Indian Olympic Association Election : भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या (आयओए) निवडणुकीत नाट्यमय घडामोडी घडत आहे. पहिल्या महिला अध्यक्षा पी. टी. उषा यांनी निवडणुकीत माघार घेतली आहे.
गुणवान खेळाडूंच्या गटातून उषा यांना पराभवाचा धक्का बसल्याने, तेव्हाच त्यांच्या अध्यक्ष बनण्याच्या आशा संपुष्टात आल्या होत्या. निवडणुकीचा अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी त्यांनी अर्ज न भरल्याने, त्यांनी निवडणुकीत माघार घेतल्यावर शिक्कामोर्तब झाला.
भारतीय ऑलिम्पिक संघटनेची नवी कार्यकारी परिषदेची पाच डिसेंबरला निवड होत आहे. याचवेळी चार वर्षे अध्यक्षा राहिलेल्या उषा यांचा कार्यकाळ संपुष्टात येईल. गुणवान खेळाडूंच्या (Sport) गटातून दहा डिसेंबर 2022 रोजी उषा या पहिल्या महिला अध्यक्षा झाल्या होत्या. पण याच गटातून त्यांना आता पराभव पत्कारावा लागला आहे.
उषा यांच्या अध्यक्षा बनण्याच्या आशा संपुष्टात येताच, त्यांना आइस हाॅकी संघटनेने पाठिंबा दिला होता. त्यामुळे त्या पुन्हा अध्यक्षा होतील, अशी आशा बळावली होती. पण निवडणुकीच्या (Election) शेवटच्या दिवशी त्यांनी अर्जच दाखल केला नाही. त्याचवेळी त्यांनी निवडणुकीत माघार घेतल्यावर शिक्कामोर्तब झाला.
IAS Officer Harassment Case : महिला IAS अधिकाऱ्याच्या छळाचा आरोप; विजय यांच्या सत्ताधारी पक्षाच्या आमदारावर FIR, तामिळनाडूत खळबळ!
तिरंदाजी महासंघाचे सचिव वीरेंद्र सचदेवा, ऑलिम्पिक पदक विजेता नेमबाज गगन नारंग यांनी अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केले आहेत. तलवारबाजी संघटनेचे राजीव मेहता देखील अध्यक्षपदासाठी इच्छुक असून ते मैदानात आहेत. त्यामुळे भारतीय आॅलिम्पिक संघटनेच्या अध्यक्षपदासाठी तीन उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहे.
Shivsena Santosh Pawar missing : 50 लाखांच्या नोटांचा बॉक्स, व्हिडीओ व्हायरल अन् आता शाखाप्रमुख बेपत्ता? संदीप देशपांडे म्हणाले, 'अपहरण तर झाले नाही ना?'
या जागांवर होणार लढत
माजी टेबल टेनिसपटू कमलेश मेहता यांनी कोषाध्यक्षपदासाठी अर्ज भरला असून, त्यांनी बिनविरोध निवड होण्याची शक्यता आहे. उपाध्यक्षपदासाठी महिलांच्या एकमेव जागेसाठी अंजू बाॅबी जाॅर्ज यांचा एकमेव अर्ज दाखल झाला आहे. सहसचिवपदाच्या दोन जागांसाठी चार अर्ज दाखल झाले आहेत. कार्यकारी परिषदेच्या सहा जागांसाठी सर्वाधिक अर्ज आले आहेत. वरिष्ठ उपाध्यक्षपदासाठी दोन अर्ज आले आहेत.
कार्यकारी परिषदेची एकूण सदस्यसंख्या 16
अध्यक्ष, वरिष्ठ उपाध्यक्ष, दोन उपाध्यक्ष, कोषाध्यक्ष, दोन सहसचिव आणि कार्यकारी परिषदेच्या जागांसाठी निवडणूक होणार आहे. खेळाडू आयोगाच्या अध्यक्ष पी. व्ही. सिंधू आणि उपाध्यक्ष हरमनप्रीत सिंग हे देखील कार्यकारी परिषदेत सहभागी होतील. आयओसी सदस्याचा समावेश धरून कार्यकारी परिषदेची एकूण सदस्यसंख्या 16 इतकी आहे.
Gokul Milk Union: गोकुळ दूध संघाच्या सत्तेचा आज दुपारपर्यंत फैसला; शासन नियुक्त संचालक अन् अध्यक्षपदाचा तिढा सुटणार!
गेल्या सहा महिन्यांपासून सुरू असलेल्या गोकुळ दूध संघाच्या सत्ता संघर्षाचा निकाल आज दुपारपर्यंत लागणे शक्य आहे. कोरम अभावी निर्माण झालेल्या पेचामुळे महायुतीकडून चार शासन नियुक्त संचालकांच्या आदेशाला न्यायालयात आव्हान देऊन समविचारी आघाडीकडून अध्यक्ष पदाला देखील आव्हान देण्यात आले आहे.
त्याची महत्त्वाची सुनावणी आज दुपारी तीन वाजता पार पडणार आहे. गोकुळच्या सत्ता संघर्षात न्यायालयाची बाजू आणि निकाल महत्त्वाची असून आज कोल्हापूर सर्किट बेंच काय निकाल देणार याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे.
10 नोव्हेंबर रोजी गोकुळ दूध संघाची दुसरी सभा पार पडली. या सभेत राज्य सरकारकडून चार शासन नियुक्त संचालकांची निवड करून त्यांना मतदानाचा अधिकार दिला. समविचारी आघाडीचे बहुमत असून देखील अध्यक्षपदापासून वंचित रहावे लागले. सभेच्या गणपूर्तीसाठी 14 संचालकांची आवश्यक असल्याने महायुतीकडे देखील बारा संचालक होते. त्यामुळे शासन नियुक्त संचालकांना मतदानाचा अधिकार देऊन 10 नोव्हेंबरच्या सभेत महायुतीचे राजेश पाटील हे अध्यक्ष झाले.
NMC Recruitment 2026 : नाशिक महापालिकेत 204 पदांसाठी मेगाभरती; महिन्याला 1.10 लाखांपर्यंत पगार, असा करा अर्ज!
तत्पूर्वी राज्य सरकारच्या या आदेशाला समविचारी आघाडी कडून आणि काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंच येथे आव्हान देण्यात आले
यापूर्वी न्यायालयाकडून निकाल देत असताना न्यायालयाकडून होणाऱ्या अंतिम निकालाला अधीन राहून अध्यक्ष निवडणूक सभा झाली असल्याने आज होणाऱ्या सुनावणीत न्यायालय काय निर्णय देणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले आहे. दरम्यान कोल्हापूर सर्किट बेंच येथे दुपारी तीन वाजता या संदर्भात सुनावणी होणार आहे. यापूर्वी झालेल्या सुनावणीत मुकुल रोहतगी यांनी राज्य सरकाराची बाजू मांडली होती.
Relief Hospital Case : पालघर मारहाण प्रकरणात शिंदेंनी हकालपट्टी केलेल्या नेत्याला दिलासा नाहीच; जामीन अर्ज फेटाळला, नीलम संखे यांचा निर्णय १ डिसेंबरला
Palghar News : पालघरच्या रिलीफ रुग्णालयात झालेल्या गोंधळ आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याच्या प्रकरणात अटकेत असलेले शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख कुंदन संखे यांच्या जामीन अर्जावर न्यायालयाने नकारात्मक भूमिका घेतली आहे. पालघर जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाने त्यांचा नियमित जामीन अर्ज फेटाळला. जिल्हा न्यायाधीश-२ तथा अतिरिक्त सत्र न्यायाधीश सागर नारायणराव पाटील यांनी हा निर्णय दिला. आरोपीला जामीन मिळाल्यास साक्षीदारांवर दबाव निर्माण होण्याची शक्यता न्यायालयाने व्यक्त केली. यासोबतच तपास यंत्रणेच्या कामकाजाबाबतही न्यायालयाने काही कठोर निरीक्षणे नोंदवली आहेत.
कुंदन संखे यांच्याविरोधात यापूर्वी सात गुन्हे दाखल असल्याची माहिती न्यायालयासमोर मांडण्यात आली. त्यातील सहा प्रकरणांत त्यांची निर्दोष मुक्तता झाली असून, एक खटला अद्याप न्यायप्रविष्ट आहे. राजकीय पद आणि प्रभावाचा वापर करून फिर्यादी किंवा साक्षीदारांवर दबाव आणण्याची अथवा पुराव्यांमध्ये हस्तक्षेप करण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे न्यायालयाने नमूद केले. या बाबींचा विचार करून संखे यांचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला.
या प्रकरणात न्यायालयीन कोठडीत असलेल्या शिवसेनेच्या नगरसेविका नीलम संखे यांनीही जामिनासाठी अर्ज केला आहे. त्यांच्या अर्जावर १ डिसेंबर रोजी सुनावणी होणार आहे. कुंदन संखे यांचा जामीन नाकारण्यात आल्यानंतर नीलम संखे यांच्या अर्जावर न्यायालय काय निर्णय देते, याची उत्सुकता आहे.
Palghar Relief Hospital Case : रिलीफ रुग्णालय राडा: सहा जामीन अर्ज फेटाळले; 23 आरोपी कोठडीतच
दहीहंडी उत्सवाच्या काळात गोविंदा पथकातील एका जखमी सदस्याच्या उपचारावरून ५ सप्टेंबर रोजी पालघरच्या रिलीफ रुग्णालयात वाद निर्माण झाला होता. या वादादरम्यान शिवसेनेच्या तत्कालीन पदाधिकाऱ्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी रुग्णालयात गोंधळ घातल्याचा, डॉक्टर व कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करून धमकावल्याचा आरोप करण्यात आला होता.
रुग्णालयातील कर्मचारी विवेक झिंगा यांना मारहाण झाल्याची तक्रार पालघर पोलिसांकडे दाखल करण्यात आली. त्यानंतर शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांसह सात अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला. या प्रकरणात पोलिसांनी एकूण २३ जणांना अटक केली असून, त्यापैकी ११ गोविंदा आणि एका कॅमेरामनला जामीन मिळाला आहे.
या प्रकरणात शिवसेनेचे निलंबित जिल्हाप्रमुख कुंदन संखे, त्यांचा वाहनचालक, शहरप्रमुख राहुल घरत, युवासेना प्रमुख साईराज पाटील, आमदारपुत्र रोहित गावीत, ऋषभ वारे, राहुल संखे, शुभम बांदिवडेकर, नगरसेविका नीलम संखे आणि सदस्य मनोज घरत हे न्यायालयीन कोठडीत आहेत. सप्टेंबरपासून आरोपींकडून जामिनासाठी विविध अर्ज दाखल करण्यात आले; मात्र अद्याप काही आरोपींना दिलासा मिळालेला नाही. सोमवारी कुंदन संखे यांच्या नियमित जामीन अर्जावर सुनावणी होऊन न्यायालयाने तो फेटाळला.
जामीन अर्जावरील सुनावणीदरम्यान न्यायालयाने वैद्यकीय उपचारांची जबाबदारी सरकारी यंत्रणेवर असल्याचे स्पष्ट केले. केवळ आजारपणाच्या कारणावरून जामीन मंजूर करता येणार नसल्याचेही न्यायालयाने नमूद केले. रुग्णालयातील काही कर्मचाऱ्यांनी नोकरी सोडल्याची बाब तक्रारदाराकडून न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यात आली होती. या मुद्द्याची योग्य पद्धतीने मांडणी न झाल्याबद्दल न्यायालयाने तपास यंत्रणेच्या भूमिकेवर निरीक्षणे नोंदवली.
Palghar Hospital Case : सर्वोच्च न्यायालयाच्या एका निर्णयामुळे शिंदेंच्या आमदारपुत्राला दणका! डॉक्टर मारहाणप्रकरणात सहा जणांचे जामीन रद्द
आरोपीला जामिनावर सोडल्यास साक्षीदारांवर दबाव आणला जाण्याची किंवा पुराव्यांशी छेडछाड होण्याची शक्यता असल्याचे न्यायालयाने म्हटले. जामीन अर्ज फेटाळताना सर्वोच्च न्यायालय आणि मुंबई उच्च न्यायालयातील संबंधित प्रकरणांमध्ये नोंदवलेल्या न्यायालयीन निरीक्षणांचाही आधार घेण्यात आला.
NMC Recruitment 2026 : नाशिक महापालिकेत 204 पदांसाठी मेगाभरती; महिन्याला 1.10 लाखांपर्यंत पगार, असा करा अर्ज!
सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी महत्त्वाची बातमी आहे. नाशिक महानगरपालिकेत तब्बल 204 रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत 18 संवर्गांमधील ही पदे भरली जाणार आहेत. विशेष म्हणजे, काही पदांसाठी निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा 1.10 लाख रुपयांपर्यंत पगार मिळणार आहे. त्यामुळे वैद्यकीय क्षेत्रातील पात्र उमेदवारांसाठी ही मोठी संधी मानली जात आहे.
नाशिक महानगरपालिका भरती 2026 साठी 25 नोव्हेंबरपासून अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांना 2 डिसेंबर 2026 पर्यंत अर्ज करता येणार आहे. या भरतीमध्ये वैद्यकीय अधिकारी, विविध विषयांचे तज्ज्ञ डॉक्टर, स्टाफ नर्स, एएनएम, मिश्रक आणि संगणक ऑपरेटर यांसह विविध पदांचा समावेश आहे.
CJP Election Strategy : CJP युपी निवडणुकीच्या रिंगणात उतरणार का? अभिजीत दीपकेंनी स्पष्टच सांगितली पुढची रणनीती
या भरतीतील वेतनाबाबत सांगायचे झाल्यास, शल्यचिकित्सक, स्त्रीरोगतज्ज्ञ, अस्थिरोगतज्ज्ञ, बालरोगतज्ज्ञ, क्ष-किरण तज्ज्ञ, बधिरीकरण तज्ज्ञ, त्वचारोगतज्ज्ञ आणि मानसोपचारतज्ज्ञ या पदांसाठी दरमहा 1,10,000 रुपये मानधन दिले जाणार आहे. तर वैद्यकीय अधिकारी पदासाठी 75,000 रुपये मानधन निश्चित करण्यात आले आहे. स्टाफ नर्स, एएनएम, मिश्रक आणि संगणक ऑपरेटर पदांसाठी दरमहा 23,455 रुपये मानधन मिळणार आहे.
कोणत्या पदांसाठी किती जागा?
एकूण 204 जागांमध्ये स्टाफ नर्सच्या 79, एएनएमच्या 57, वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या 15, मिश्रकच्या 15 आणि संगणक ऑपरेटरच्या 10 जागांचा समावेश आहे. याशिवाय इतर तज्ज्ञ डॉक्टर आणि तंत्रज्ञांची 28 पदे भरली जाणार आहेत.
उमेदवारांची निवड कशी होणार?
उमेदवारांची निवड एकूण 100 गुणांच्या आधारे केली जाणार आहे. यामध्ये शैक्षणिक पात्रतेच्या अंतिम वर्षातील गुणांना 50 टक्के, तर मुलाखतीला 50 टक्के महत्त्व दिले जाणार आहे. निवड झालेल्या उमेदवारांची सुरुवातीची नियुक्ती 6 महिन्यांसाठी तात्पुरत्या स्वरूपात केली जाणार आहे. ही भरती मानधन तत्त्वावर असेल.
Rahul Gandhi : राहुल गांधींनी इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केला रितेश-जेनेलियाचा रोमँटिक फोटो; नेमकं कारण काय?
नाशिक महापालिका भरतीसाठी अर्ज कुठे करायचा?
या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी नाशिक महानगरपालिकेच्या https://nmc.gov.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी. अर्ज आवश्यक कागदपत्रांसह सार्वजनिक आरोग्य विभाग, 3 रा मजला, राजीव गांधी भवन, शरणपूर रोड, नाशिक येथे कार्यालयीन वेळेत प्रत्यक्ष सादर करायचा आहे.
अर्ज करण्याची अंतिम तारीख 2 डिसेंबर 2026 असल्याने इच्छुक उमेदवारांनी शेवटच्या दिवसाची वाट न पाहता अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी. अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात वाचून पदनिहाय शैक्षणिक पात्रता, अटी आणि आवश्यक कागदपत्रांची माहिती तपासणे महत्त्वाचे आहे.
Latur Bank Chairman : लातूर जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी धीरज देशमुख, उपाध्यक्षपदी अविनाश जाधव यांना संधी
Latur News : लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी धीरज देशमुख तर उपाध्यक्षपदी अविनाश बाळासाहेबजी जाधव यांची बिनविरोध निवड झाली आहे. नुकत्याच झालेल्या जिल्हा बँकेच्या निवडणुकीत धीरज देशमुख यांच्या नेतृत्वाखालील सहकार पॅनलला बहुमत मिळाले होते. 19 पैकी 15 जागांवर 'सहकार'ने मिळवल्या होत्या.
गेली पाच वर्ष धीरज देशमुख यांच्याकडेच जिल्हा बँकेचे अध्यक्षपद होते. आता दुसऱ्यांदा त्यांच्याकडे अध्यक्षपद आले आहे.
या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांनी धीरज देशमुख यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे भाजपला मोठा धक्का बसला होता. भाजपचे आमदार अभिमन्यू पवार यांच्या पत्नी शोभा पवार या देखील सहकार पॅनलसोबत होत्या. त्यांची निवड बिनविरोध झाली होती.
देशमुख यांच्या विरोधात भाजप आमदार संभाजी पाटील निलंगेकर, आमदार बसवराज पाटील, आमदार संजय बनसोडे, आमदार रमेश कराड यांनी परिवर्तन पॅनलले उभे करून आव्हान उभे केले होते. मात्र, निवडणुकीत सहकार पॅनलले मोठा विजय मिळवत एकहाती सत्ता मिळवली होती.
Latur DCC Bank: लातूर जिल्हा बँकेतला कथित गैरकारभार थांबवणार; मुख्यमंत्र्यांसोबतच्या भेटीत नवनिर्वाचित संचालकांची ग्वाही
पारदर्शनक कारभाराची ग्वाही
लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत मिळालेल्या विजयाच्या पार्श्वभूमीवर नवनिर्वाचित संचालकांनी शिष्टमंडळाने मुंबई येथे  राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. यावेळी लातूर जिल्हा बँकेतील आजपर्यंत सुरू असलेला कथित गैरकारभार थांबवून बँकेत पारदर्शक आणि लोकाभिमुख कारभार सुरू करण्यासह जिल्ह्यातील सहकार क्षेत्र अधिक समृद्ध करण्याची ग्वाही शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांना दिली.
Latur DCC Bank : भाजपला 'दे धक्का'... पाच नाही, चारच; नवनिर्वाचित संचालक CM फडणवीसांच्या भेटीला, आमदाराच्या पत्नी गैरहजर
Rahul Gandhi : राहुल गांधींनी इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केला रितेश-जेनेलियाचा रोमँटिक फोटो; नेमकं कारण काय?
Rahul Gandhi Instagram Story : लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी काँग्रेसचे दिवंगत नेते तथा राज्याचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचा मुलगा अभिनेता रितेश देशमुख आणि सून अभिनेत्री जेनेलिया डिसूझा यांचा फोटो इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केला आहे.
खुद्द राहुल गांधी यांनी रितेश आणि जेनेलिया यांचा रोमँटिक फोटो शेअर केल्याने अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. कारण राहुल यांनी या दोघांचा फोटो का शेअर केला, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. मात्र, या फोटोला त्यांच्या एका जुन्या वक्तव्याची किनार आहे. राहुल यांनी त्यांची आई सोनिया गांधी यांच्या 'बिलॉंगिंग: अ जर्नी ऑफ लव्ह' या आत्मचरित्राच्या प्रकाशन सोहळ्यादरम्यान आई-वडिलांच्या जुन्या आठवणी सांगितल्या होत्या.
यावेळी त्यांनी, "आमच्या घरी जेवणावेळी आई अनेकदा बाबांच्या मांडीवर बसलेली पाहायचो," असं वक्तव्य केलं होतं. त्यांच्या या विधानावरून सोशल मीडियावर बरीच चर्चा रंगली होती. अशातच रितेश देशमुख आणि जेनेलिया यांनी अशाच प्रकारचा फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये जेनेलिया रितेश यांच्या मांडीवर बसल्याचं दिसत आहे. हा फोटो रितेश यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केला आहे.
NCP Politics : यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी सुनेत्रा पवार अन् सुप्रिया सुळे एकत्र; राजकीय चर्चांना उधाण
त्यामुळे राहुल गांधी यांनी त्यांचा हा फोटो आपल्या स्टोरीवर शेअर करत, त्यांच्यावर टीका करणाऱ्यांना जणू अप्रत्यक्षपणे पती-पत्नीमधील प्रेम नेमकं कसं असतं, हे दाखवण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा रंगली आहे. दरम्यान, रितेश यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर मंगळवारी हा फोटो शेअर केला होता. ‘दोघांसाठी टेबल, एकासाठी खुर्ची’, असं कॅप्शन त्यांनी या फोटोखाली दिलं आहे.
Shivsena News : ठाकरेंच्या सेनेला आणखी एक खिंडार? थेट शिंदेंच्या मंत्र्यासोबत आमदाराचा 'तो' फोटो व्हायरल; राजकारणात मोठी खळबळ!
राहुल गांधी नेमकं काय म्हणाले होते?
राहुल गांधी यांनी सोनिया गांधी यांच्या 'बिलॉंगिंग: अ जर्नी ऑफ लव्ह' या आत्मचरित्राच्या प्रकाशन सोहळ्यादरम्यान आई-वडिलांच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. ते म्हणाले, "आमच्या घरी जेवणावेळी आई अनेकदा बाबांच्या मांडीवर बसलेली असे. मला वाटायचे की, हे सामान्य असेल. इतरांच्या घरातही असेच होत असेल. मी मित्रांच्या घरी गेलो, तेव्हा मला फरक लक्षात आला. मी माझ्या मित्रांना विचारले की, तुझी आई तुझ्या वडिलांच्या मांडीवर का बसत नाही?" अशी मिश्किल टिप्पणी त्यांनी या कार्यक्रमात केली होती. त्यामुळे आता शेअर केलेल्या स्टोरीमुळे त्यांच्या या जुन्या वक्तव्याची चर्चा नव्याने सुरू झाली आहे.
Shivsena Santosh Pawar missing : 50 लाखांच्या नोटांचा बॉक्स, व्हिडीओ व्हायरल अन् आता शाखाप्रमुख बेपत्ता? संदीप देशपांडे म्हणाले, 'अपहरण तर झाले नाही ना?'
Mumbai cash video controversy : मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पैशांनी भरलेल्या बॉक्सचा एक व्हिडीओ समोर आणत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदीप देशपांडे यांनी राजकीय वर्तुळात चर्चा निर्माण केली आहे. हा व्हिडिओ एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे कुलाबा येथील शाखाप्रमुख संतोष पवार यांचा असल्याचा दावा देशपांडे यांनी केला आहे.
या व्हिडिओमध्ये सुमारे 50 लाख रुपये असलेला नोटांचा बॉक्स वरिष्ठ नेत्याकडून मिळाल्याचे पवार सांगत असल्याचा दावा मनसेने केला आहे. आता या प्रकरणाला नवे वळण मिळाले असून, संतोष पवार अद्याप समोर आले नसल्याचे सांगत संदीप देशपांडे यांनी त्यांच्या सुरक्षिततेबाबत चिंता व्यक्त केली आहे.
संतोष पवार कालच्या पत्रकार परिषदेनंतर समोर आलेले नाहीत, असा दावा मनसेचे संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांनी केला. यावर बोलताना ते म्हणाले, "कालच्या पत्रकार परिषदेपासून संतोष पवार गायब आहेत. त्यांचे अपहरण तर झालेले नाही ना? त्यांच्या जीवाला धोका तर नाही ना? पोलिसांनी त्यांना तत्काळ शोधले पाहिजे. त्यांना संरक्षण दिले पाहिजे." या व्हिडिओसंदर्भातील सर्व प्रश्नांची उत्तरे संतोष पवार यांनीच द्यावीत, असेही देशपांडे यांनी स्पष्ट केले. संबंधित व्हिडिओतील पैशांचा स्रोत काय, ते पैसे कोणी दिले आणि त्यामागचा नेमका उद्देश काय होता, याची सखोल चौकशी झाली पाहिजे, अशी त्यांची मागणी आहे.
या प्रकरणी पोलिसांकडे (Police) तक्रार दाखल केल्याचे संदीप देशपांडे यांनी सांगितले. तसेच निवडणूक आयोगाकडेही तक्रार करण्यात आली आहे. हा विषय निवडणुकीशी संबंधित असल्याने संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी झाली पाहिजे, अशी मनसेची भूमिका आहे. निवडणूक आयोगाने या प्रकरणाची दखल घेऊन पोलिसांकडे तक्रार करावी आणि एफआयआर दाखल करण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणीही देशपांडे यांनी केली आहे.
Sandeep Deshpande Video  : 'ते' 50 लाख राहुल नार्वेकरांच्या भावाला निवडून आणण्यासाठी? शिंदेंच्या शिवसेनेचे शाखाप्रमुख संतोष पवार यांच्या व्हिडीओवरून खळबळ
दरम्यान, संबंधित व्हिडीओ आठ महिन्यांपूर्वीचा असल्याची भूमिका एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील नेत्यांकडून मांडली जात आहे. मात्र, व्हिडिओ जुना असल्याचे कारण देऊन प्रकरणाची चौकशी टाळता येणार नाही, असे म्हणत संदीप देशपांडे यांनी या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले. ते म्हणाले, "आठ महिन्यांपूर्वीचा विषय जरी असला, तरी तो निवडणुकीशी संबंधित आहे. त्यामुळे चौकशी झालीच पाहिजे. आठ महिन्यांपूर्वी एखादा खून झाला आणि तो त्यानंतर उघडकीस आला, तर त्याची चौकशी होतेच ना? प्रकरण जुने झाले म्हणून ते सोडून देता येत नाही." व्हिडीओ किती जुना आहे, यापेक्षा त्यामध्ये दाखवण्यात आलेला प्रकार घडला होता की नाही, हे तपासणे महत्त्वाचे आहे, असेही देशपांडे यांनी म्हटले.
MSRTC NCMC Card Recharge : एसटीच्या महिला आणि ज्येष्ठ प्रवाशांसाठी मोठा दिलासा! आता फक्त पाच रुपयांत कार्ड रिचार्ज; महामंडळाचा महत्त्वाचा निर्णय
प्रभाग क्रमांक 226 चा नेमका संदर्भ काय?
संदीप देशपांडे यांनी समोर आणलेल्या व्हिडिओचा संबंध मुंबई महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 226 मधील निवडणुकीशी असल्याचा दावा केला आहे. संतोष पवार हे या प्रभागातील एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे विभागप्रमुख असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे या व्हिडिओमुळे संबंधित प्रभागातील निवडणुकीची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे. या प्रभागात महायुतीकडून भाजपचे उमेदवार मकरंद नार्वेकर यांनी निवडणूक लढवली होती. ते विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे बंधू आहेत. दुसरीकडे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि मनसे यांची युती होती.
राजकीय वाद पुन्हा ऐरणीवर.....
या निवडणुकीत उमेदवारी अर्ज मागे घेणे, काही अर्ज बाद होणे आणि मनसेच्या उमेदवाराचा अर्ज बाद होणे अशा घडामोडींमुळे प्रभाग क्रमांक 226 चर्चेत आला होता. आता पैशांनी भरलेल्या बॉक्सचा कथित व्हिडिओ आणि त्याचा निवडणुकीशी जोडला जाणारा संदर्भ यामुळे या प्रभागातील राजकीय वाद पुन्हा ऐरणीवर आला आहे.
निवडणूक आयोगाच्या भूमिकेकडे लक्ष
मनसेने या प्रकरणाची पोलिस आणि निवडणूक आयोगामार्फत चौकशी करण्याची मागणी केली आहे. मात्र, व्हिडिओतील दाव्यांची स्वतंत्र पडताळणी होणे आणि संबंधित संतोष पवार यांची बाजू समोर येणे महत्त्वाचे ठरणार आहे. त्यामुळे या प्रकरणात पोलिस आणि निवडणूक आयोग काय भूमिका घेतात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
Latur Politics: निलंगेकर बंधूंचे घायाळ करणारे शाब्दिक हल्ले, आर्थिक गैरव्यवहारांवरुन डिवचलं, अखेर संयमी अमित देशमुखांनी राजकारणाचा 'पॅटर्न' बदलला
Latur News: लातूर जिल्ह्यातील राजकीय वातावरण ऐन थंडीत तापले आहे. जिल्हा बँकेतील सत्ता कायम राखल्यानंतर काँग्रेसचे आमदार अमित देशमुख चांगलेच आक्रमक झाले आहेत. जिल्हा बँकेच्या निवडणुकीदरम्यान विरोधी पॅनेलचे नेते आमदार संभाजी पाटील निलंगेकर आणि अरविंद पाटील निलंगेकर या बंधूंनी देशमुख कुटुंबावर वैयक्तिक टीकेसह आर्थिक गैरव्यवहारांचे गंभीर आरोप केले होते. प्रचाराच्या बहुतांश काळात संयम बाळगणाऱ्या अमित देशमुखांनी निवडणुकीच्या अखेरच्या टप्प्यात या आरोपांना प्रत्युत्तर दिले. आता बँकेतील सत्ता राखल्यानंतर त्यांनी भाजपविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे.
टिपू सुलतान यांच्याबद्दलच्या विधानाने सुरू झालेली राजकीय चर्चा आणि त्यानंतर दहा वर्षांपूर्वीच्या लातूरच्या जलदूतवरून भाजप सरकारवर केलेला गंभीर आरोप, या दोन्ही घडामोडींमुळे अमित देशमुख यांच्या बदललेल्या राजकीय रणनीतीची चर्चा होत आहे.
सात हजारांच्या मताधिक्याने दिला इशारा?
२०२४ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने लातूरची जागा जिंकली. डॉ. शिवाजी काळगे यांनी मोठा विजय मिळवत भाजपला धक्का दिला. मात्र, त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला मोठा झटका बसला. महायुतीच्या लाडकी बहीण योजनेचा प्रभाव असतानाही अमित देशमुख यांनी आपला मतदारसंघ राखला. मात्र, सात हजारांच्या आसपासचे मताधिक्य हे काँग्रेससाठी भविष्यातील आव्हानाची जाणीव करून देणारे ठरले.
या निवडणुकीनंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये अमित देशमुख यांनी वेगळी रणनीती अवलंबली. विशेषतः लातूर महापालिकेच्या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीला सोबत घेण्याचा त्यांचा निर्णय काँग्रेससाठी फायदेशीर ठरला. महापालिकेतील सत्तेनंतर काँग्रेसचा पारंपरिक मतदार कायम राखण्यासोबतच सामाजिक आणि राजकीय समीकरणे मजबूत करण्यावर देशमुखांचा भर राहिला.
Ramdas Athwale News: '...तर मी  आरपीआयचे अध्यक्ष पद सोडायला तयार!'; केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचं धाराशिवमध्ये मोठं विधान
नगरपालिका आणि नगरपरिषदांच्या निवडणुकांमध्ये संमिश्र यश मिळाल्यानंतर सहकार क्षेत्रातील देशमुख कुटुंबाचे वर्चस्व कायम राखण्याचे मोठे आव्हान त्यांच्यासमोर होते. माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांचे मार्गदर्शन असले तरी यंदा निलंगेकर बंधूंनी जिल्हा बँकेतील देशमुखांच्या सत्तेला थेट आव्हान दिले होते.
निलंगेकरांच्या रणनीतीला धक्का
जिल्हा बँकेच्या निवडणुकीत अमित देशमुख यांच्यासाठी सर्वांत महत्त्वाची राजकीय घडामोड ठरली ती म्हणजे सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांची मिळालेली साथ.
राज्यात महायुतीची सत्ता असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री असलेल्या बाबासाहेब पाटील यांनी जिल्हा बँकेच्या निवडणुकीत काँग्रेसच्या पॅनेलला साथ दिली. जिल्हा बँकेची निवडणूक पुढे ढकलून प्रशासक नियुक्त करण्याचा विरोधकांचा कथित प्रयत्नही यशस्वी झाला नाही. औशाचे भाजप आमदार अभिमन्यू पवार यांची भूमिकाही निलंगेकरांच्या पॅनेलला अपेक्षित असलेल्या राजकीय समीकरणांशी जुळणारी नव्हती.
महायुतीतील या विसंवादाचा फायदा देशमुखांच्या पॅनेलला झाला. दुसरीकडे, निलंगेकर बंधूंनी प्रचारात जिल्हा बँकेच्या आर्थिक व्यवहारांचा मुद्दा उपस्थित करत देशमुख कुटुंबाला लक्ष्य केले.
Dattatray Bharne : 'नमो शेतकरी योजना आणि अग्रीम रक्कम एकच', गोंधळानंतर कृषी मंत्री दत्ता भरणेंची सारवासारव; म्हणाले, फाईल पाठवलीय...
आर्थिक व्यवहारांवरून उठवले रान
गेल्या तीन दशकांपासून जिल्हा बँकेवर देशमुख कुटुंबाचे वर्चस्व आहे. हे वर्चस्व संपुष्टात आणण्यासाठी निलंगेकर बंधूंनी यंदा आक्रमक प्रचार केला. बँकेतील ठेवी, कर्जवाटप, शेतकऱ्यांना दिले जाणारे पीककर्ज आणि देशमुख कुटुंबाशी संबंधित उद्योगांना मिळणाऱ्या कथित आर्थिक लाभांवर त्यांनी प्रश्न उपस्थित केले.
जिल्हा बँकेकडून शेतकऱ्यांना पीककर्ज देण्याऐवजी देशमुख कुटुंबाशी संबंधित कारखाने आणि संस्थांना कर्जवाटपात प्राधान्य दिले जात असल्याचा आरोप संभाजी पाटील निलंगेकर यांनी केला होता. बँकेतील काही अधिकारी सत्ताधाऱ्यांच्या मर्जीतील असून, निवृत्तीनंतरही त्यांना महत्त्वाच्या पदांवर ठेवले जात असल्याचा दावाही त्यांनी केला.
एवढ्यावरच न थांबता शेतकऱ्यांचा पैसा चित्रपटसृष्टीत गेल्याचा गंभीर आरोप निलंगेकरांनी केला. बँकेचा कारभार पारदर्शक असल्याचा दावा करणाऱ्या सत्ताधाऱ्यांनी या आर्थिक व्यवहारांचा हिशेब जनतेसमोर मांडावा, असे आव्हान त्यांनी दिले होते.
Sandeep Deshpande Video  : 'ते' 50 लाख राहुल नार्वेकरांच्या भावाला निवडून आणण्यासाठी? शिंदेंच्या शिवसेनेचे शाखाप्रमुख संतोष पवार यांच्या व्हिडीओवरून खळबळ
या आरोपांमुळे जिल्हा बँकेची निवडणूक केवळ सहकार क्षेत्रापुरती मर्यादित न राहता देशमुख आणि निलंगेकर कुटुंबांतील राजकीय संघर्षाचा केंद्रबिंदू ठरली.
'दृश्यम'ला 'रामायण'ने उत्तर
निलंगेकरांच्या आरोपांना जिल्हा बँकेचे तत्कालीन अध्यक्ष धीरज देशमुख यांनी प्रत्युत्तर दिले. बँकेचा कारभार पारदर्शक असून, कर्जवाटप करताना रिझर्व्ह बँकेच्या मार्गदर्शक सूचना आणि लेखापरीक्षणाचे निकष पाळण्यात आल्याचा दावा त्यांनी केला.
चित्रपटसृष्टीत बँकेचा पैसा गुंतवल्याचा आरोपही त्यांनी फेटाळून लावला. संभाजी पाटील निलंगेकर यांनी आरोप करताना 'दृश्यम' चित्रपटाचा संदर्भ दिला होता. त्याला उत्तर देताना धीरज देशमुख यांनी आपला कारभार रामायणासारखा स्पष्ट असल्याचा टोला लगावला.
अमित देशमुख यांनीही प्रचाराच्या अखेरच्या टप्प्यात मैदानात उतरत भाजपच्या राजकीय रणनीतीवर प्रश्न उपस्थित केले. अनेक वर्षांपासून सुरळीत सुरू असलेल्या सहकार क्षेत्रात विनाकारण हस्तक्षेप करून निवडणूक लादण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांना आपल्या बाजूने वळवण्याचा भाजपचा प्रयत्न असल्याचा दावाही त्यांनी केला.
भाजपच्या चार संचालकांची एन्ट्री
जिल्हा बँकेतील सत्ता कायम राखण्यात देशमुखांना यश आले असले तरी या निवडणुकीतून विरोधकांनीही बँकेच्या संचालक मंडळात प्रवेश मिळवला आहे.
अनेक वर्षे बिनविरोध निवडणुकीची परंपरा असलेल्या जिल्हा बँकेत यंदा देशमुखांना प्रत्यक्ष निवडणुकीला सामोरे जावे लागले. सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांची साथ मिळाल्यानंतरही भाजपचे चार संचालक निवडून आले. त्यामुळे देशमुखांचे बँकेवरील वर्चस्व कायम असले तरी संचालक मंडळात विरोधकांचा आवाज असणार आहे. निवडणुकीच्या प्रचारात उपस्थित करण्यात आलेले आर्थिक व्यवहार, कर्जवाटप आणि बँकेच्या कारभारासंबंधीचे मुद्दे विरोधी संचालक आगामी काळात पुन्हा उपस्थित करणार का, याकडेही लक्ष राहणार आहे.
टिपू सुलतानबद्दलचे विधान रणनीतीचा भाग?
जिल्हा बँकेतील विजयानंतर अमित देशमुख यांनी टिपू सुलतान यांच्याबद्दल केलेल्या विधानाने जिल्ह्यातील राजकारणाला नवे वळण मिळाले. त्यांच्या या विधानावरून भाजपने टीका करण्यास सुरुवात केली. विधानसभा निवडणुकीतील घटलेले मताधिक्य, महापालिका निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीशी केलेली आघाडी आणि काँग्रेसचा पारंपरिक मतदार टिकवण्याचे आव्हान, या पार्श्वभूमीवर देशमुखांच्या विधानाकडे पाहिले जात आहे.
आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून काँग्रेसची मतपेढी मजबूत करण्याच्या रणनीतीचा हा भाग असावा का, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. मात्र, देशमुखांनी या विधानामागील असा कोणताही राजकीय हेतू स्पष्ट केलेला नाही.
दहा वर्षांपूर्वीच्या 'जलदूत'चा मुद्दा
टिपू सुलतान यांच्याबद्दलच्या विधानावरून भाजप आणि काँग्रेसमध्ये राजकीय संघर्ष सुरू असतानाच अमित देशमुख यांनी दहा वर्षांपूर्वीच्या लातूरच्या पाणीटंचाईचा मुद्दा उपस्थित केला. २०१६ मध्ये मिरजहून रेल्वेने लातूरला पाणी आणण्याचा तत्कालीन भाजप सरकारचा निर्णय हा दिवंगत माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांची प्रतिमा मलिन करण्याच्या षडयंत्राचा भाग होता, असा गंभीर आरोप अमित देशमुख यांनी केला.
विलासराव देशमुख यांच्या राजकीय वारशाशी संबंधित मुद्दा उपस्थित करत अमित देशमुख यांनी भाजपसमोर नवा राजकीय प्रश्न उभा केला आहे.
बचावात्मक भूमिकेतून आक्रमक राजकारणाकडे?
जिल्हा बँकेच्या निवडणुकीत देशमुख कुटुंबाच्या आर्थिक व्यवहारांवरून निलंगेकरांनी आक्रमक भूमिका घेतली होती. त्यावेळी प्रचाराच्या बहुतांश काळात संयम बाळगणारे अमित देशमुख आता स्वतः भाजपविरोधात विविध मुद्दे उपस्थित करत आहेत.
महापालिकेतील सत्ता, जिल्हा बँकेवरील कायम राहिलेले वर्चस्व आणि स्थानिक पातळीवर महायुतीतील मतभेद या पार्श्वभूमीवर अमित देशमुख यांच्या बदललेल्या राजकीय भूमिकेला महत्त्व प्राप्त झाले आहे.
टिपू सुलतान यांच्याबद्दलचे विधान आणि त्यानंतर जलदूतवरून केलेला आरोप, या स्वतंत्र राजकीय प्रतिक्रिया आहेत की विरोधकांना बचावात्मक भूमिकेत आणण्याच्या व्यापक रणनीतीचा भाग आहेत, हे आगामी घडामोडींमधून स्पष्ट होईल. मात्र, जिल्हा बँकेच्या निवडणुकीपुरता मर्यादित असलेला देशमुख-निलंगेकर संघर्ष आता लातूर जिल्ह्याच्या व्यापक राजकारणात विस्तारत असल्याचे दिसत आहे.